S M Garge Biography : पत्रकारिता, इतिहास आणि समाजविचारांचा ज्ञानसंपन्न वारसा; स. मा. गर्गे यांच्या कार्याचा वेध

S M Garge Biography and Intellectual Legacy : इतिहास, पत्रकारिता, समाजकारण आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या स. मा. गर्गे यांच्या जीवनकार्याचा आणि वैचारिक प्रवासाचा परिचय नव्या चरित्रग्रंथातून घडतो.
S M Garge Biography and Intellectual Legacy

S M Garge Biography and Intellectual Legacy

esakal

Updated on: 

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

ज्येष्ठ पत्रकार, इतिहाससंशोधक आणि समाजविज्ञान कोशकार स. मा. गर्गे यांच्यावरील ‘व्रतस्थ ज्ञानसाधक स. मा. गर्गे’ हा चरित्रग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. त्यांच्या कन्या कविता भालेराव यांनी हा ग्रंथ लिहिला असून, पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या निमित्ताने गर्गे यांचा जीवनप्रवास, कार्य आणि विचारांचा घेतलेला हा वेध.

महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत, की ज्यांचे कार्य अनेक ज्ञानशाखांमध्ये पसरलेले आहे. स. मा. गर्गे हे असेच आंतरज्ञानशाखीय व्यक्तिमत्त्व होते. इतिहास, राज्यशास्त्र, समाजकारण, राजकारण आणि संस्कृती यांचा त्यांनी अभ्यास केला होता. पाव शतकाहून अधिक काळ त्यांनी पत्रकारिता केली आणि संस्थाचालक म्हणूनही काम केले. ते चालता-बोलता ज्ञानकोश होते.

संघर्षमयप्रवास

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील लहुरी या छोट्याशा गावातून गर्गे यांचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. पुढे ते पुण्यात आले. त्या काळात पत्रकारितेसमोर मोठी आव्हाने होती. त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागले. तरीही जिद्द आणि निष्ठेच्या बळावर त्यांनी पुण्यात स्वतःचे स्थान निर्माण केले. कविता भालेराव यांनी हा संघर्षमय प्रवास संवेदनशीलपणे मांडला आहे. त्यामुळे हा ग्रंथ एका व्यक्तीचे चरित्र असण्यासोबतच एका कालखंडाचा वैचारिक दस्तऐवजही आहे.

Loading content, please wait...