‘मै जिंदगी का साथ निभाता...’ 

सचिन सारोळकर, मानसशास्त्रज्ञ 
Sunday, 15 November 2020

आजची किशोरवयीन मुले करतात. खरेच ही पिढी आपल्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने जीवनाकडे बघते. त्यांचा ‘नजरिया’ वेगळा आहे. हा ‘नजरिया’ रंगीबेरंगी आणि रोज रंग बदलणारा आहे.

‘हॅश टॅग’ ही या पिढीबरोबर आलेली नवीन संकल्पना आहे. ‘आई cool’, ‘बाबा it‘s ok’, ‘मी करेल मॅनेज’, ‘अरे यार, don't worry’ यासारखी वक्तव्य आजची किशोरवयीन मुले करतात. खरेच ही पिढी आपल्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने जीवनाकडे बघते. त्यांचा ‘नजरिया’ वेगळा आहे. हा ‘नजरिया’ रंगीबेरंगी आणि रोज रंग बदलणारा आहे. तसेच तो त्यांच्या जीवनशैलीचा भाग होत आहे. या वयोगटातील बहुतेक मुले सकाळी उठल्यावर इन्स्टाग्रॅम, स्नॅपचाट, व्हॉटसॅप जसे अपडेट करतात त्याचप्रमाणे येणारा दिवसही अपडेट करतात. 

गेलेल्या दिवसाचे ओझे नाही आणि येणाऱ्या दिवसाची नाहक चिंता नाही. आजचा दिवस आणि त्यातही हा क्षण आपण किती आनंदाने जगू शकतो, हे या पिढीकडून बघून आपण लक्षात घ्यायला हवे. ही पिढी अतिशय उथळ, बेजबाबदार, आळशी, मोठ्यांचा आदर न करणारी अशी अनेक विशेषणे आपण पालक, शिक्षक, समाज म्हणून या पिढीला लावत असतो. पण आपला हा चष्मा बाजूला काढून एका वेगळ्या ‘नजरिया’ने त्याकडे बघायला हवे, नाही का? 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यासाठी आपल्याला मागील काही महिन्यांमध्ये वेळ मिळाला आहेच. मुलांबद्दल बोलताना शक्य असेल तिथे व तेव्हा मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया हे’, हे गाणे आजच्या पिढीने प्रत्यक्षात आणले आहे. ही पिढी येणाऱ्या समस्यांकडे, आव्हानांकडे सकारात्मक पद्धतीने बघते. ही पद्धत आपल्या पिढीला रुचेलच असे नाही. पण शांतपणे, निरपेक्षपणे विचार केला तर ते पचते. 

कमळाच्या पानावर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे ही पिढी आहे. सगळ्यांबरोबर असूनही ते वेगळे आहेत, त्यांची स्वतःची मत आहेत. ठामपणे, स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत मांडण्याची हिंमत, क्षमता त्यांच्यामध्ये नक्कीच आहे. जुन्या नवीन पिढीमध्ये संघर्ष तर होतोच आणि या संघर्षाला आविष्काराची जोड देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

३० ते ४० वर्षांपूर्वी आपण ‘ब्लॅक अँड व्हाइट’ टीव्हीपासून ‘स्मार्ट’ टीव्हीपर्यंत होणारे बदल बघितले आहेत, स्वीकारलेही आहेत. याचप्रमाणे अनेक गोष्टी स्वीकारून आपल्या जीवनशैलीत, विचारशैलीत बदलही केले आहेत. या पिढीबरोबर येणारा दिवस किती आनंदाने घालवता येईल आणि नातेसंबंध अजून किती घट्ट करता येईल, यासाठी आपल्या जुन्या चष्म्याच्या फ्रेम्स बदलूया. एकदा त्यांच्याबरोबर त्यांच्या पद्धतीने बोलायला काय हरकत आहे. त्यांच्या स्वातंत्र्यातून स्वैराचार होणार नाही, याची काळजी ते आणि आपण घेणार आहोतच ना? 

सळसळणारे रक्त, प्रचंड ऊर्जेचे स्त्रोत, उत्साहाचा झरा असे आपण या वयोगटातील मुलांकडे पाहू शकतो. आपण त्यांना कोणत्याही एका चौकटीत बांधू शकत नाही. कारण त्यांचे बोलणे, वागणे, परफॉर्मन्स अनपेक्षित व अनाकलनीय असतो. त्यामुळे या वयोगटाला आत्ताच्या स्थितीत समजून घेणे आपल्यासाठी आव्हानात्मक असले तरी ती काळाची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Sarolkar Psychologist write article Today generation lives in a very different way

Tags
टॉपिकस