

Marathi Books
esakal
सांगली, मुधोळ, भोर, इचलकरंजी, अक्कलकोट आणि कुरुंदवाड या संस्थानांचा इतिहास एकत्रितपणे वाचण्याची संधी पांडुरंग कृष्णा माठेकर यांनी लिहिलेल्या ‘सहा संस्थानांचा इतिहास’ या पुस्तकाद्वारे वाचकांना मिळणार आहे. लेखक माठेकर नोकरीच्या निमित्ताने सांगली, सातारा, सावंतवाडी, मुंबई, कोल्हापूर, पुणे अशा विविध ठिकाणी होते. तेथील ग्रंथालयातून व जुन्या ग्रंथांमधून माहिती घेऊन त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यासाठी सांगली, करवीर, इचलकरंजी, अक्कलकोट, मुधोळ, भोर अशा ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेटीही दिल्या. कुठे लढाया झाल्या? त्या काळचे समाजजवीन कसे होते? इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच या परकीय सत्तांचा प्रभाव कसा होता? अशा प्रश्नांची उत्तरे वाचकांना मिळू शकतील.
वैशिष्ट्य : महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा परिचय, वंशावळ, संदर्भसूची.
प्रकाशक : वरदा प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १९८ मूल्य : ३०० रु.
पुण्यश्लोक