सह्याद्रीचा माथा : ''एअर कनेक्टिविटी''साठी हवी ''हनुमान उडी''

aeroplane
aeroplaneesakal

हनुमान जन्मस्थळीवरुन (Hanuman Birthplace controversy) काही दिवसांपूर्वी वाद पेटला होता. महाबली हनुमानाची आठवण अनेकांना मंदिरात गेल्यावर होते. ''हनुमान उडी'' हा वाक्यप्रचार मराठी भाषेत तसा रुढ आहे. एखाद्यानं खूप प्रगती केली किंवा एखाद्या शहरानं, संस्थेनं विकासाचे अनेक टप्पे गाठले तर ''हनुमान उडी'' घेतली असं म्हटलं जातं. नाशिकच्या संदर्भात आता ''हनुमान उडी'' घेण्याची वेळ आली आहे. रामायणाचा (Ramayan) संदर्भ नाशिकच्या अनुषंगाने पुराणकाळापासून आहे. त्यामुळेच या अपेक्षित असलेल्या ''हनुमान उडी''ची गरज नाशिककरांना अधिक प्रकर्षानं समजू शकते. नाशिकला आजवर जे मिळायला हवं होतं ते मिळालेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. रोजगाराच्या संधी नाशिकमध्ये वेगानं निर्माण होणं, हा सध्या सर्वांत कळीचा मुद्दा आहे. नाशिकमध्ये सक्षम एअर कनेक्टिविटीची (Air Connectivity) सुरुवात झाल्यास त्याचा फायदा धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांनाही होणार आहे. (sahyadricha matha saptarang marathi article by dr rahul rahalkar nashik news psl98)

कोणत्याही शहराचा विकास हा तेथील उपलब्ध रोजगारांच्या संधीवर अवलंबून असतो. गेल्या काही वर्षांत आयटी अर्थात ''इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी'' या उद्योगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. ज्या शहरांमध्ये आयटी उद्योग आहेत, तेथील प्रगती वेगानं होते, हा आजवरचा अनुभव. अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं, तर आपल्या राज्यातील पुणे आणि अन्य राज्यातील हैदराबाद, बंगळुरु, चेन्नई या शहरांचं देता येईल. नाशिकमध्ये या शहरांइतकी क्षमता असूनही नाशिक तुलनेनं फारच मागे असल्याचं लक्षात येतं. नाशिकच्या विकासाला गती देण्यासाठी काही हवं असेल तर ते आहे, आयटी उद्योग. फक्त आयटीशी संलग्न उद्योग हवेत, असं म्हणून चालणार नाही. आयटी उद्योगांचा आणि गतीचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे आयटी तज्ज्ञांची ने-आण करण्यासाठी नियमित-निरंतर विमान सेवा अत्यंत गरजेची आहे. राष्ट्रांतर्गत उत्तम दर्जाची विमान सेवा उपलब्ध झाली, तर नाशिक लवकरच ''हनुमान उडी'' घेऊ शकेल. नाशिकची भौगोलिक, सामाजिक स्थिती, हवामान, पाणी व उपलब्ध जमिनीचा विचार करता प्रगत शहरांच्या तुलनेत इथं काहीच कमी नाही. मात्र प्रमुख अडचण आहे, ती म्हणजे राजकीय महत्त्वाकांक्षेची.

शहराला विकासाला सर्वोच्च बिंदूवर नेणारं नेतृत्व इथं नाही. ज्यावेळी नेतृत्व तयार झालं, त्या नेतृत्वाला नाशिककरांनी योग्य ते पाठबळ दिलं नाही. राजकीय पाठबळ नाही हा नेहमी होत असलेला आरोप आहे. परंतु शहराच्या विकासासाठी घरात बसून आरोळी ठोकणारे बहुसंख्य आहेत. मात्र लोकचळवळ उभी राहण्यासाठी प्रयत्न करणारे अल्पसंख्य आहेत. शिवाय त्यांनाही मर्यादा आहे. म्हणूनच नाशिकमध्ये आयटी उद्योग आणण्यासाठी व आयटी उद्योगांना पूरक किमान राष्ट्रीय हवाई सेवा नाशिकच्या ओझर विमानतळावर सुरू व्हावी, यासाठी लोकचळवळ उभी राहणं गरजेचं आहे.

aeroplane
ऊर्जा संकटाच्या हाका...

कुठल्याही शहराचा विकास भौगोलिक स्थानावर अवलंबून असतो. नाशिक शहराच्या भौगोलिक स्थानाचा विचार करता राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद या औद्योगिक शहरांच्या मध्यावर नाशिक आहे. असे असतानाही नाशिकमधून नियमित हवाईसेवा का उपलब्ध होत नाही, ही आश्चर्यकारक बाब आहे. नाशिक शहरापासून देशाची आर्थिक राजधानी मुंबई अवघ्या १८० किलोमीटर अंतरावर आहे. तर राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे १९५ किलोमीटर अंतरावर आहे. राज्यातील अजून एक पुढारलेले औद्योगिक शहर औरंगाबाद देखील नाशिकपासून १८० किलोमीटर अंतरावर आहे. शेजारच्या गुजरातमधील उद्योगांचं सुरत शहर नाशिकपासून दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. या चारही शहरांमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होते. परंतु या चारही शहरांच्या मध्यावर असलेल्या नाशिकमधून नियमित देशांतर्गत हवाईसेवा नाही. ही बाब नाशिककरांना खटकणारी आहे.

aeroplane
‘अग्निपथा’चा दूरगामी आघात

नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हा लढाऊ विमान तयार करण्याचा कारखाना व कारखान्यासाठी देशातील सर्वांत मोठी हवाईपट्टी आहे. त्यावरून देखील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु ठेवणे शक्य आहे. सध्याची हवाईसेवा केंद्र शासनाच्या उडाण योजनेअंतर्गत सुरू आहे. ही योजना नावापुरती सुरु आहे. या सेवेत कोणतीही ठोस वाढ गेल्या अनेक वर्षांत झालेली नाही. पर्यायानं या योजनेचं भवितव्य देखील अधांतरी आहे. नाशिकच्या क्षमतांचा विचार करून हवाई सेवा सुरू करण्यासाठी आता लोक चळवळ उभी राहणे हाच सध्याचा एकमेव मार्ग आहे. या सगळ्या प्रयत्नांना ''सकाळ'' समूह पूर्ण क्षमतेनं पाठिंबा देईल, हे निश्चित....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com