Indian Watercolor Art : बंगालच्या खेड्यातून जागतिक कलेपर्यंत; समीर मोंडल यांचा वॉटरकलर प्रवास

Samir Mondal Watercolor Art Journey : बंगालमधील खेड्यात सुरू झालेला समीर मोंडल यांचा कलाप्रवास वॉटरकलरच्या माध्यमातून विस्तारला. चित्रकलेसोबत रंगभूमी, रेखाचित्रे, टायपोग्राफी आणि शिक्षण क्षेत्रातील अनुभवांनी त्यांच्या कलेला नवी दिशा दिली.
Indian Watercolor Art

Indian Watercolor Art

esakal

Updated on: 

हर्ष भटकळ

जलरंगात अर्थात वॉटरकलरमध्ये काम करणाऱ्या समीर मोंडल यांनी बंगाली नियतकालिकांतून अडीचशेहून अधिक लेख लिहून दृश्यकलांचे पैलू, विशेषत: वॉटरकलरचे विश्व वाचकांना समजावले आहे. त्यांच्या बालपणात वाहणारी खेड्यातली नदी अजूनही त्यांच्या चित्रात वाहते.

देशातल्या वॉटरकलर चित्रांच्या कक्षा गेल्या चाळीस वर्षांत समीर मोंडल यांनी वाढवलेल्या आहेत. त्या तेजस्वी दिसण्यापाठी जन्मभरातले निरीक्षण, श्रम आणि स्टुडिओबाहेरही सातत्याने शिकण्याची तयारी आहे. समीर मोंडल यांच्याविषयी बोलायला लागले, की त्यांच्या वॉटरकलरचा उल्लेख अटळ आहे. आज कार्यरत असलेल्या कलावंतांपैकी क्वचितच कोणी या माध्यमातून अशा सातत्याने आणि विश्वासाने काम केले आहे हे खरे. पण त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात येते, की वॉटरकलर हे त्यांचे माध्यम असले तरी त्यांनी अनेक क्षेत्रांत काम केले आहे. रंगभूमी, रेखाचित्रे, म्युझियमची मांडणी, मुद्रणशैली (टायपोग्राफी), विज्ञान आणि शिक्षण ह्या सर्वांना त्यांच्या आयुष्यात स्थान आहे आणि प्रत्येक क्षेत्रातील अनुभवामुळे काम प्रगत झाले आहे. त्यांचा प्रवास कोणत्याही शहरात नव्हे तर बंगालमधील एका खेड्यात सुरू झाला.

नदीकाठ हाच गुरू

‘निसर्ग हा माझा पहिला शिक्षक,’ ते म्हणतात. मोंडल हे ज्या खेड्यात वाढले तिथे वीज नव्हती. पक्के रस्ते झाले नव्हते आणि एकूण जीवनाला लय होती ती ऋतू बदलांची. जवळून एक नदी वाहत होती. त्यावर होड्यांचा संचार होता. मच्छीमार जाळी टाकून मासेमारी करायचे तर मूर्तिकार गावातून दुर्गापूजेसाठी मूर्ती बनवत असत. त्यांची आई शाई घरीच तयार करत असे आणि बऱ्याचदा लिहायला ताडपत्री वापरावे लागत. ह्या सर्वांचा कलात्मक विचार त्यांच्या मनात जाणीवपूर्वक आला नाही. तरी ओल्या मातीचे रस्ते, पाण्यावरील बदलत्या प्रकाशाचे तरंग, मातीचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आणि आजूबाजूची बांबूंचे वन हे सर्व त्यांच्या नजरेत भरत. ही त्यांनी आर्ट स्कूलमध्ये जाण्यापूर्वीची गोष्ट आहे. त्यांच्या आजच्या नजरेत ही वर्षे काही शिक्षणात रंगण्याची नव्हती तर ह्या सृष्टीत डुंबून जगण्याची होती. निसर्ग, कलाकुसर आणि दैनंदिन जगणे हे एकमेकांत मिसळून गेले. त्यातूनच त्यांना रचना (फॉर्म), लय आणि रंग यांची जाण येत होती, जी त्यांना आयुष्यभर पुरली.

Loading content, please wait...