दऱ्या पण वेगळ्याच...

अमेरिकेला जाण्याची नुकतीच पुन्हा एकदा संधी मिळाली. या वेळी पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर पर्यटन करण्याची योजना होती.
America Bihad
America BihadSakal
Summary

अमेरिकेला जाण्याची नुकतीच पुन्हा एकदा संधी मिळाली. या वेळी पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर पर्यटन करण्याची योजना होती.

अमेरिकेला जाण्याची नुकतीच पुन्हा एकदा संधी मिळाली. या वेळी पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर पर्यटन करण्याची योजना होती. विशेषतः पश्चिम किनाऱ्यावरील लास वेगस, लॉस एंजल्स आणि सॅन फ्रॅन्सिस्को पाहण्याची तीव्र इच्छा होती. अनेक हॉलिवूडपटांमधून लास वेगस, तिथले कॅसिनो, त्यातले जुगाराचे प्रकार आणि एकूणच तिथलं सांध्य जीवन पाहिलं होतं. ते प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा होती. हातात चार दिवस, तीन रात्री एवढा वेळ होता. तसंच व्हर्टिकल लिमिट, व्हॅकेशन, धूम ३ आदी चित्रपटांमध्ये ग्रँड कॅन्य् न पाहिलं होतं तेही पाहण्याची इच्छा होती. ग्रँड कॅन्य् न लासवेगासहून रस्त्याने तीन तासांत जाता येतं, विमानानं कमी वेळ लागतो. आम्ही रस्त्यानं गेलो. अतिशय सुंदर रस्ता होता. तब्बल ४४६ किलोमीटर लांबीचं हे ग्रँड कॅन्य् न संपूर्ण रस्ताभर तुमची साथ करतं. कॅन्यन म्हणजे शब्दशः ५०० ते १८०० मीटरपर्यंतचे उंच कडे असलेल्या दऱ्या. आपल्याकडे चंबळ नदीच्या खोऱ्यात जसं दृष्य दिसतं, तसंच पण अतिशय भव्य असं या कॅन्य् नचं दर्शन होतं. हिंदीमध्ये याला जास्त चपखल शब्द आहे - ‘बीहड.’

अॅरिझोना राज्यामध्ये कोलोरॅडो नदीच्या खोऱ्यामध्ये हे अमेरिकन ‘बीहड’ आहे. ते नैसर्गिक आहे, अद्‍भुत आहे आणि खरोखर ‘याचि देही, याचि डोळां’ पाहण्यासारखं आहे. कोलोरॅडो पठार नैसर्गिक भूगर्भशास्त्रीय हालचालींमुळे पृथ्वीच्या पोटातून वर येताना पृथ्वीला जी भेग पडली आणि खोल-खोल जात गेली, त्यामुळे ही दरी तयार झाली. या प्रक्रियेमध्ये खडकांचे आतले स्तर अधिकाधिक उघडे पडत गेले. खडकांचा प्रत्येक स्तर पृथ्वीच्या आयुष्यातला एक विशिष्ट कालावधी दर्शवतो असं भूगर्भशास्त्र सांगतं.

अगदी तळाशी म्हणजे दोन अब्ज वर्षांपूर्वी तयार झालेल्या खडकांच्या स्तराचं नाव आहे, विष्णू खडक. हो. विष्णू खडक. १८९४ मध्ये एका संशोधकाला त्यातला एक मोठा खडक विष्णूच्या मंदिरासारखा दिसला आणि त्यावरून त्या संपूर्ण स्तरालाच विष्णूचं नाव मिळालं. सुमारे ५०-६० लाख वर्षांपासून कोलोरॅडो नदी या मार्गाने वाहते आहे आणि इतक्या वर्षांमध्ये तिनं आपल्या प्रवाहामुळे इथले खडक कापण्याचं काम सुरुच ठेवलं आहे.

मूळ अमेरिकन रहिवासी हजारो वर्षांपासून या दरीतील कडेकपाऱ्यांमध्ये राहात आहेत आणि त्यांच्याकरता हे एक पवित्र स्थळ आहे. त्यातल्या प्युएब्लो जमातीसाठी तर ग्रँड कॅन्य् न हे एक तीर्थक्षेत्र आहे. या केंद्राची दक्षिण कडा आणि उत्तर कडा अशी दोन टोकं आहेत आणि त्यातली उत्तर कडा (नॉर्थ रिम) दक्षिण कडेपेक्षा सुमारे १००० फूट उंच आहे (एकूण उंची समुद्रसपाटीपासून ८,००० फूट). या दोन्ही कडांवर पर्यटक म्हणून जाता येतं. मात्र दक्षिण कडेवर राफ्टिंग, हायकिंग, धावणे इ. खेळांची सोय आहे. तसंच हेलिकॉप्टरनं देखील हवाई चक्कर मारण्याची सोय आहे. त्यातून दिसणारं विहंगम दृष्य अविस्मरणीय म्हणावं असं असते. इथे १२६ किलोमीटर अंतराची ग्रँड कॅन्य् न अल्ट्रा मॅरॅथॉन स्पर्धादेखील आयोजित केली जाते. उत्तर कडेपेक्षा दक्षिण कडेला पर्यटक जास्त जातात कारण तिथे जाण्याकरता रस्ते वर्षभर खुले असतात. शिवाय तिथं स्कायवॉक म्हणजे, काचेची गॅलरीदेखील बसवलेली आहे ज्यातून तुम्ही खोलपर्यंत पाहू शकता. ७० फूट पुढे आलेला हा अर्धगोलाकार काचेचा सज्जा तुम्हाला तब्बल चार हजार फूट खालचे दृश्य पाहणे शक्य करतो आणि ते पाहून अक्षरशः डोळे फिरतात. तरीही हा अनुभव नक्की घेण्यासारखा आहे.

उत्तर कडेवर मात्र हिवाळ्यात रस्ते बंद होतात कारण तपमान -२९ अंशापर्यंत जाते आणि प्रचंड बर्फ पडतो. दोन्ही कडांवर तुम्ही कँपिंगदेखील करू शकता मात्र त्याकरता तुम्हाला परमिट घ्यावं लागतं. दरवर्षी सुमारे तीस हजार अर्ज येतात आणि १३ हजार परवाने दिले जातात, ज्यावर सुमारे चाळीस हजार लोक इथे एक रात्र राहून जातात. दक्षिण कडेला तुम्ही पायी, खेचरांवर किंवा हेलिकॉप्टरनं तळापर्यंत जाऊ शकता मात्र खाली जाताना तापमान वाढत जातं आणि त्याचा त्रास होऊ शकतो. मी पहिल्या दिवशी प्रत्यक्ष जमिनीवरून ग्रँड कॅन्य् नचं दर्शन घेतलं आणि मी इतका भारावून गेलो की, दुसऱ्या दिवशी अन्य ठिकाणी जाण्याचं रद्द करून मी हेलिकॉप्टरमधून आकाशातूनही ग्रँड कॅन्य् नच बघितलं.

अर्थात, तरीही माझं समाधान झालं नाहीच. हल्ली १५०० फूटांपेक्षा जास्त जवळून हेलिकॉप्टरमधूनही जायला परवानगी नाही. पण या रंगीबेरंगी खडकांच्या उभ्या भिंती आकाशातून पाहताना जे विहंगम दृश्य दिसतं त्याला खरोखरच तोड नाही. खाली काड्यापेट्यांसारख्या गाड्या आणि मुंग्यांसारखी माणसं यांच्या तुलनेत इथल्या खडकांची भव्यता खऱ्या अर्थानं लक्षात येते आणि थरारून जायला होतं. आपण एक नैसर्गिक चमत्कारच पाहतो आहोत हे क्षणोक्षणी इथं जाणवतं. उगाच नाही दरवर्षी किमान ४०-५० लाख लोक इथं येत, असा विचार करतच मी परतलो. गिर्यारोहक, पायी फिरण्याची आवड असणारे, साहसी लोक, चित्रकार, छायाचित्रकार अशा सर्वच प्रकारच्या लोकांकरता ग्रँड कॅन्य् न ही एक पर्वणी ठरावी. आयुष्यात एकदा तरी ग्रँड कॅन्य् नला भेट दिला पाहिजे आणि हा थरारक अनुभव घेतला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com