Old Coins
Old CoinsSakal

व्यापार आणि देशभक्तीही!

ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई बेट मिळाल्यानंतर त्यांनी तिथे झपाट्याने जम बसवण्यास सुरुवात केली. १६७२ मध्ये तिथे टाकसाळही उघडली.
Summary

ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई बेट मिळाल्यानंतर त्यांनी तिथे झपाट्याने जम बसवण्यास सुरुवात केली. १६७२ मध्ये तिथे टाकसाळही उघडली.

ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई बेट मिळाल्यानंतर त्यांनी तिथे झपाट्याने जम बसवण्यास सुरुवात केली. १६७२ मध्ये तिथे टाकसाळही उघडली. पण, इंग्रजी ‘डिझाइन’ची नाणी हिंदुस्थानातील एतद्देशीय व्यापारीवर्ग वापरायला कचरत असे. याचं मुख्य कारण म्हणजे, त्यावरची ‘अगम्य’ इंग्रजी अक्षरं. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी पक्के देशप्रेमी. मुघल सम्राट औरंगजेबाच्या ‘प्रजे’मध्ये त्यांचा सामावेश होत नसल्याने त्यांचा मुघल सम्राटाच्या नावाने नाणी पाडण्यास विरोध होता. मात्र, याचबरोबर धंदा होणंही महत्त्वाचं होतं. स्थानिक लोकांसारखी नाणी बनवल्याशिवाय ते अशक्य होतं. मग काय करायचं?

शेवटी त्यांनी मुघल नाण्यांसारखी फारसीत, पण इंग्लंडच्या राजाच्या नावाने मुंबईत नाणी पाडणं सुरू केलं. (तेव्हाची एवढीशी कंपनी - पण त्यांचं त्यांच्या राजावरचं प्रेम पहा!) ह्या नाण्यांनी औरंगजेब साहजिकच खवळला. त्याने खाफीखानाला पाठवून याचा बंदोबस्त करण्यास फर्मावलं. खाफीखानाकडून धमकीवजा पत्रं जाताच कंपनी नरमली. औरंगजेबही दक्षिणेत उतरत होता. १६९६ मध्ये कंपनीने ही सगळी नाणी जमा करून वितळवून टाकली, त्यामुळे ही नाणी आज आपल्याला सहसा पहायला मिळत नाहीत.

सोबतचं नाणं त्यापैकी एक. १६९३ चं. एका बाजूला लिहिलंय ‘सिक्का झद दौरान उईलियम ऐन मेरी’ (भावार्थ - राजा विल्यम आणि राणी मेरीच्या राजवटीत पाडलं गेलेलं हे नाणं आहे), दुसऱ्या बाजूला लिहिलंय ‘सनह जुलूस ४ अंग्रेज शाहीन झर्ब मुन्बई’ (भावार्थ - इंग्रज राज्यकर्त्यांच्या राजवटीच्या चौथ्या वर्षात हे नाणं मुंबईत पाडलं गेलं आहे). ही नाणी फक्त जानेवारी - फेब्रुवारी १६९३ मध्ये पाडली गेली आणि नंतर १६९६ मध्ये सगळीच वितरण आणि विनिमयातून गेली. आज जगात अशी फक्त ४ किंवा ५ नाणी शिल्लक आहेत. सोबतचा फोटो त्यातल्या एकाचा.

धंदा महत्त्वाचाच; पण तितकंच देशप्रेमही, ही गोष्ट आपण ईस्ट इंडिया कंपनीकडून शिकू शकतो का?

(सदराचे लेखक लंडनस्थित इतिहासाचे अभ्यासक आणि अर्थशास्त्राचे जाणकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com