
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
एका कार्यक्रमाआधी ग्रीन रूममध्ये कलाकार, पाहुणे यांचं चहापान चालू होतं. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करणाऱ्या ताईंची लगबग जाणवत होती. पाण्याचा ट्रे समोर येताच म्हणाल्या, ‘‘नाही बाई, मी आणलंय माझं गरम पाणी. शिवाय मध, खडीसाखर ठेवावीच लागते जवळ.’’ अर्थात हे ऐकून मनात म्हणलं आधी गाणं ऐकूया आणि मगच प्रभावित व्हायचं का ठरवूया आणि गाणं सुरू झालं! पण गाण्यात होणारी चुकीच्या शब्दांची पेरणी कानाला खटकत होती आणि गीताचा अर्थही त्यामुळे बदलत होता. गाण्याने अर्थाचं दर्शन न घडवल्यामुळे गाण्यापूर्वीचं ‘प्रदर्शन’ अगदीच प्रभावहीन ठरलं. आणि तुकोबांचे शब्द आठवले-