

Interdisciplinary Study of Environment
esakal
सतीश लळीत - saptarang@esakal.com
पर्यावरण, निसर्गाचे रक्षण हा विषय हल्लीच्या काळात जरा दुर्लक्षित होत असताना संतोष शिंत्रे यांनी कष्टपूर्वक सिद्ध केलेला ‘पैस पर्यावरणसंवादाचा’ हा ग्रंथ पर्यावरण क्षेत्रातील संशोधक, अभ्यासक आणि या संदर्भातील चळवळी यांच्यासाठी संदर्भमूल्य म्हणून उपयुक्त ठरणारा आहे.
पर्यावरणसंवाद म्हणजे ‘एन्व्हायरोन्मेंटल कम्युनिकेशन’ ही पाश्चिमात्य जगात तीन दशकांपूर्वी आंतरविद्याशाखीय अभ्यास म्हणून विकसित झालेली संकल्पना भारतात अद्याप अपरिचित आहे. हा विषय ‘मतप्रभावी’ नसल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले. भारतातच नव्हे, तर जगभरात निसर्ग-पर्यावरणाचा अपरिमित, अपरिवर्तनीय विनाश सुरू आहे. या दृष्टिकोनातून लेखकाने काही तथ्ये मनोगतात मांडली आहेत. ती समजून घेतली तर ग्रंथवाचनाचा पुढचा प्रवास सोपा होतो.