तुझ्यामुळे मी झाले आई (डॉ. सुजाता वढावकर)

डॉ. सुजाता वढावकर
रविवार, 17 मे 2020

डॉक्‍टर म्हणाले ः ""अभिनंदन. तुम्ही आई होणार आहात!'' सलोनीचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता; पण तिला खूप आंनद झाला. मात्र, क्षणभरातच तिला मागच्या वेळचं सगळं आठवलं. तिनं तसं डॉक्‍टरांना सांगितल्यावर डॉक्‍टर म्हणाले ः ""डोंट वरी.'' तिलाही ते पटलं. घरी आल्यावर तिनं शांतपणे सर्वांना न्यूज दिली.

डॉक्‍टर म्हणाले ः ""अभिनंदन. तुम्ही आई होणार आहात!'' सलोनीचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता; पण तिला खूप आंनद झाला. मात्र, क्षणभरातच तिला मागच्या वेळचं सगळं आठवलं. तिनं तसं डॉक्‍टरांना सांगितल्यावर डॉक्‍टर म्हणाले ः ""डोंट वरी.'' तिलाही ते पटलं. घरी आल्यावर तिनं शांतपणे सर्वांना न्यूज दिली. सासूबाई म्हणाल्या ः ""आता महिना दोन महिने रजा घे. उगीच दगदग धावपळ करू नकोस.'' तिलाही ते पटलं. तिनं महिन्याभराची रजा टाकली. येणाऱ्या आनंदाबरोबर धाकधुक तर होतीच. काळजी घेणं आवश्‍यक होतं. आरामात दिवस चालले होते; पण पुन्हा अचानक पोटात दुखू लागलं. पुन्हा हॉस्पिटल! पुन्हा तेच. ऍबॉर्शन...

सलोनी ऑफिसमधून आली तीच मुळी "आज मैं उपर आसमां नीचे' असं गुणगुणत. खरंच आज तिला खूपच आनंद झाला होता. तिचा एकंदरीत मूड पाहता सासूबाईंनी विचारलंच ः ""काय गं! आज काही विशेष?'' ती सहज म्हणाली ः ""हो तर! पण मी तुम्हाला नंतर सांगीन!'' ""बरं बरं'' म्हणत सासूबाई चहाच्या तयारीला लागल्या. सलोनीनं झटपट आपला सेलफोन काढला अन्‌ सतीशला फोन लावला ः ""हॅलो मी बोलतेय. अरे कधी येणार आहेस घरी? मला तुला एक मस्त गूड न्यूज द्यायचीय!'' ""अगं मग बोल की!,'' पलीकडून आवाज आला.
""अंहं! असं फोनवर नाही सांगणार तू उडत उडत घरी ये,'' असं म्हणून तिनं फोन ठेवून दिला. अर्ध्या तासानं सतीश आला तो अगदी अधीर मनानं! गूड न्यूज काय असेल, याची त्याला कल्पना होती; पण ते सगळं सलोनीकडून ऐकायचं होतं. बूट काढून तो बेडरूममध्ये आला. सलोनी कॉटवर पहुडलेली होती.
""हं बोला राणी सरकार! बंदा हाजीर है!''
सलोनी झटकन्‌ उठली आणि त्याच्या गळयात हात टाकून म्हणाली ः ""तुला प्रमोशन मिळालं! अरे मी आई होणार अन्‌ तू बाबा !'' ""खरंच?'' तिला जवळ घेत तो म्हणाला ः ""हो. तर आपलं स्वप्न पुरं होणार! चल आईबाबांना सांगूया.''
ते हॉलमध्ये आले. आईबाबांना सांगितल्यावर तेही खूश झाले. लग्नानंतर दोन वर्षांनी घरात बाळ येणार होतं. महिनाभर सलोनी खूश होती.
अन्‌ अचानक एके दिवशी तिच्या ओटीपोटात दुखू लागलं. घाईघाईनं तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तिथं सगळी बेडशीट अन्‌ कपडे खराब झाले होते. तिचं ऍबॉर्शन झालं होतं. तिला खूप थकवा आला होता. मनानं अन्‌ शरीरानं ती गळून गेली होती. तिच्या डॉक्‍टरांनी तिला बराच धीर दिला ः ""अगं, आत्ता 25 वर्षाची आहेस, होतं असं कधी कधी. परत बघू लवकर दिवस जातील.''

रित्या मनानं अन्‌ शरीरानं ती घरी आली. एक महिना सक्तीची महिनाभर रजा झाली. या काळात सासूबाईनी तिला बराच धीर दिला.
तिचं रोजचं रूटिन सुरू झालं. एक दिवस ती सकाळी उठली, तिच मुळी उलट्या करत! कोरड्या उलट्या! कसाबसा चहा घेतला, तर तोही बाहेर पडला. सासूबाईंना शंका आली; पण त्याही गप्प बसल्या. त्या दिवशी सलोनी ऑफिसला गेलीच नाही. संध्याकाळी डॉक्‍टरांकडे गेली, तर डॉक्‍टरानी टेस्ट्‌स करायला सांगितल्या. त्याप्रमाणे सगळं करून ते डॉक्‍टरांकडे परत गेले. डॉक्‍टर म्हणाले ः ""अभिनंदन. तुम्ही आई होणार आहात!''
तिचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता; पण तिला खूप आंनद झाला. मात्र, क्षणभरातच तिला मागच्या वेळचं सगळं आठवलं. तिनं तसं डॉक्‍टरांना सांगितल्यावर डॉक्‍टर म्हणाले ः ""डोंट वरी. बी पॉझिटिव्ह.''
तिलाही ते पटलं. घरी आल्यावर तिनं शांतपणे सर्वांना न्यूज दिली. सासूबाई म्हणाल्या ः ""आता महिना दोन महिने रजा घे. उगीच दगदग धावपळ करू नकोस.''
तिलाही ते पटलं. तिनं महिन्याभराची रजा टाकली. येणाऱ्या आनंदाबरोबर धाकधुक तर होतीच. काळजी घेणं आवश्‍यक होतं. आरामात दिवस चालले होते; पण पुन्हा अचानक पोटात दुखू लागलं. पुन्हा हॉस्पिटल! पुन्हा तेच. ऍबॉर्शन. सलोनी तर कोलमडूनच गेली. शरीरापेक्षा मनानं थकली. आपल्या नशीबात मूलच नाही, असंच तिला वाटत होतं. घरचे सगळे धीर देत होते. सतीश तिला फुलासारखा जपत होता. सलोनी मात्र उभारी धरत नव्हती. मध्यंतरीच्या काळात सतीशनं चांगल्या गायनॅकॉलॉजिस्टची भेट घेतली. त्यांनी सलोनीला व्यवस्थित तपासलं. सलोनीच्या गर्भाशयाची क्षमता कमी पडत होती. म्हणून गर्भ फार काळ राहू शकत नव्हता.

""यांच्यावर काय उपाय?,'' सतीशनं विचारलं.
डॉक्‍टर थोडे विचारात पडले. मग म्हणाले ः ""उपाय आहे; पण थोडा खर्चिक आहे.''
सतीशनं त्यांना ग्रीन सिग्नल दिला. म्हणाला ः ""ठीक आहे; पण सांगा तर खरं.''
डॉक्‍टर म्हणाले, की "आपण तुमचे दोघांचे बीजांड आणि शुक्रजंतू घेऊया, अन्‌ ते टेस्टटयूबमध्ये फर्टीलाइज करूया. आणि ते फलित झाले, की 3-4 महिने आपण टेस्टट्युबमध्येच ठेवूया आणि तीन महिन्यांनी ते सलोनीच्या गर्भाशयात ठेवूया. तोपर्यंत तिची तब्येतही सुधारेल, आणि ती प्रेग्नसी बेअर करू शकेल. बघा विचार करा.''
सलोनीचं चित थाऱ्यावर नव्हतंच. ती खूप नर्व्हस झाली होती. तीन महिन्यांनी तरी आपल्या पोटात बाळ राहील नं? या चिंतेनं घेरलं होतं. इथं सतीशला वेगळीच चिंता होती. आपल्या घरातले आई-बाबा हे टेस्टट्युब बेबी प्रकरण स्वीकारतील का? घरामध्ये वातावरण जरी पुढारलेलं असलं, तरी हा नवा विचार त्यांच्या पचनी पडेल याची खात्री नव्हती. इकडे सलोनी पण टेस्टट्युब बेबीचा विचार करू लागली. तिला कसंही करून बाळ हवं होतं. तिला आई बनायचं होतं. मग त्यासाठी काय वाटेल ते करायची तिची तयारी झाली.

सतीशनं तिला आपली शंका बोलून दाखवली ः ""आपण जरी तयार असलो, तरी आई-बाबांचं काय? इतर नातेवाईकांचं काय? हे मूल आपलंच असं ते मानतील का? आणि नाही मानलं तर मग ते त्यांची प्रतिक्रिया काय असेल? काय करावं? त्यांना सांगावं का नाही?''
सलोनी पण म्हणाली ः ""आपण त्यांना सांगायलाच नको. त्यांना ही आधुनिक कल्पना सहन होणार नाही. मग ते आपल्या बाळाला आपलं नातवंड मानणार नाहीत, त्याचे लाड करणार नाहीत, त्यापेक्षा नकोच! आपण सांगायलाच नको! पण तीन-चार महिन्यांनी पोट दिसायला लागेल, मग काय सांगायचं? पहिले तीन महिने पोटात बाळ नव्हतं अन्‌ आताच कसं आलं?''
एक नाही अनेक शंका भेडसावू लागल्या.
शेवटी त्यांनी ठरवलं, की काहीही झालं, तरी टेस्टट्युब बेबीची प्रक्रिया करायचीच. मग बघू पुढं काय होतं ते! त्यानुसार त्यांनी डॉक्‍टरांची अपोईटमेंट घेतली. त्या दोघांनी आपल्या सगळ्या शंका कुशंका बोलून दाखवल्या. डॉक्‍टरही म्हणाले ः ""ठीक आहे. इतक्‍यात काही सांगू नका. पाहिजे तर आपण नंतर जरूर सांगू.'' ठरल्याप्रमाणं दोघांचे बीजांड आणि शुक्रजंतू घेतले गेले आणि एका टेस्टट्युबमध्ये त्यांचं फर्टीलायझेशन करण्यात आलं. गर्भ चांगला वाढत होता. इकडे सलोनीचं गर्भाशय सक्षम करण्याची ट्रीटमेंट चालू होतीच. योग्य कालावधीनंतर ते फलित बीज सलोनीच्या गर्भाशयात सोडण्यात आले. आता खरी परीक्षा सुरू झाली. बाळ गर्भाशयात टिकतं का नाही ! या धाकधुकीत 15 दिवस झाले. डॉक्‍टरांनी तपासणीसाठी सलोनीला बोलवून घेतलं. त्यांच्या काही टेस्ट त्यांनी केल्या अन्‌ बाहेर येऊन हसतच त्यांनी सलोनीला आणि सतीशला सांगितलं ः ""येस! एव्हरीथिंग इज फाइन.'' सतीश समाधानानं हसला अन्‌ सलोनी खुदकन्‌ हसली- खूप दिवसांनी!

हळूहळू तिचं पोटही दिसू लागलं, तसं सतीशच्या आईनं विचारणा केलीच ः ""अगं सलोनी, तुला सुरवातीला पहिल्या महिन्यांत त्रास कसा झाला नाही. नाही उलट्या, नाही चक्कर हे कसं काय? आणि आता एकदम चार महिन्यांचा गर्भ! हे झालंच कसं?''
यथावकाश सतीशनं सगळं समजावून सांगितलं; पण त्यांना काही ते पटेना. शेवटी सतीशचे आई-बाबा एवढंच म्हणाले, की ते काही असू दे. कुठं काही बोलू नका अन्‌ होऊन जाऊदे एक छानसं नातवंड! काय बरोबर नं!''
सलोनीनं एका छानशा बाळाला जन्म दिला. सगळं घर आंनदानं नाचू लागलं. ती मात्र सतत गुणगुणत राहिली ः "तुझ्यामुळे मी झाले आई!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang dr sujata wadhavkar write kathastu article