kaushal inamdar
kaushal inamdar

मानसचित्रांचा अनुवाद (कौशल इनामदार)

एके दिवशी पं. सत्यशील देशपांडे यांची ‘ठुमरी कथा’ ही ध्वनिमुद्रिका ऐकत असताना त्यांनी रंगवलेली विरहिणी काळजाचा ठाव घेऊन गेली. माझ्या मनात अचानक विचार आला : एका अल्बममध्ये साधारण आठ गाणी असतात. या आठ गाण्यांमधून आपण स्त्रीमनाचे वेगवेगळे विभ्रम सादर केले, तर आपला हेतू साध्य होईल. यातून जान्हवीच्या आवाजातली नाट्यमयताही प्रभावीपणे गाण्यामध्ये वापरली जाईल आणि स्त्रीमनाचे विविध विभ्रम दाखवताना तिच्या आवाजातल्या वेगवेगळ्या भावनिक छटाही सादर करण्याची संधी मिळेल.

कुण्या एका लेखकानं आपल्या लेखनप्रक्रियेबद्दल एक मार्मिक भाष्य करून ठेवलं आहे. तो म्हणतो : ‘‘एक कथा लिहायची म्हणजे तीनच अडचणी असतात : सुरुवात, मध्य, आणि शेवट. बाकी सगळं सोपं असतं!’’... ‘जान्हवी’ हा अल्बम करत असताना मला या सत्याचा प्रत्यय आला!
जान्हवी प्रभू-अरोरा या गायिकेशी माझी ओळख कवी सौमित्रनं जवळपास वीस वर्षांपूर्वी करून दिली होती.
‘‘एक चांगली गायिका आहे. तू तिचं गाणं ऐकावंस असं मला वाटतं. मी तिला तुझ्याकडे पाठवतोय!’’ असं फोनवरच सौमित्रने मला बजावलं होतं.
जान्हवीला भेटलो त्याक्षणीच मला ती आधी माणूस म्हणून आणि मग गायिका म्हणून भावली. निर्मळ स्वभावाची आणि सतत खळखळून हसणारी जान्हवी गायिका म्हणून खूप लवचिक आणि हरहुन्नरी आहे, हे तिच्या पहिल्या भेटीतच समजलं. ‘अमृताचा वसा’ या माझ्या कार्यक्रमातून जान्हवी बरंच गायली आणि गायिका म्हणून तिच्यामधल्या गुणांचा मला परिचय होत गेला. जान्हवीच्या गाण्याचा सगळ्यात मोठा गुण तिच्या आवाजातली नाट्यमयता आहे. पुढे जान्हवी ‘सारेगमप’मधून लोकांसमोर आली. अवधूत गुप्तेनंसुद्धा जान्हवीमधले हे गुण हेरले आणि त्याच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘सनई चौघडे’ या चित्रपटात तिला गाण्याची संधी दिली. त्यानंतर जान्हवी अनेक संगीतकारांकडे आणि अनेक कार्यक्रमातून गाते आहे.

जान्हवी आणि तिचे पती समीर अरोरा माझ्याकडे जान्हवीसाठी एक अल्बम करण्याची कल्पना घेऊन आले. जान्हवीमधल्या गायिकेचे सगळे गुण श्रोत्यांपुढे यावेत असा अल्बम तयार करावा, या माझ्या विचारावर सर्वांचं एकमत झालं. नुसताच आठ सुट्या गाण्यांचा समूह न करता, आठ गाणी वेगवेगळी असूनही त्यांचं काही एकत्रित म्हणणं असेल, तर मजा येईल असा विचार माझ्या मनाला चाटून गेला.
एके दिवशी पं. सत्यशील देशपांडे यांची ‘ठुमरी कथा’ ही ध्वनिमुद्रिका ऐकत असताना त्यांनी रंगवलेली विरहिणी काळजाचा ठाव घेऊन गेली. शब्द होते : ‘‘पिया बिन नागन है काली रैन...’’ आणि माझ्या मनात अचानक विचार आला : एका अल्बममध्ये साधारण आठ गाणी असतात. या आठ गाण्यांमधून आपण स्त्रीमनाचे वेगवेगळे विभ्रम सादर केले, तर आपला हेतू साध्य होईल. यातून जान्हवीच्या आवाजातली नाट्यमयताही प्रभावीपणे गाण्यामध्ये वापरली जाईल आणि स्त्रीमनाचे विविध विभ्रम दाखवताना तिच्या आवाजातल्या वेगवेगळ्या भावनिक छटाही सादर करण्याची संधी मिळेल.
पुढचा प्रश्न असा होता, की हे स्त्रीमनाचे विभ्रम गाण्यात कसे उतरवायचे? नृत्यामध्ये भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामधल्या ‘अष्टनायिकां’चा आविष्कार मी बऱ्याच वेळा पाहिला होता. काही भारतीय अभिजात आणि उपशास्त्रीय संगीतामध्येही अष्टनायिका या विषयावरचे कार्यक्रम मी पाहिले होते. पण अजूनही ‘अष्टनायिका’ ही संकल्पना भावसंगीतात कुणी मांडली आहे, असं माझ्या ऐकिवात नव्हतं. मग आपण हा अल्बम ‘अष्टनायिका’ असं सूत्र घेऊनच सादर करावा हा निर्णय घेतला.

या अष्टनायिकेंमधली एक नायिका आहे एके दिवशी पं. सत्यशील देशपांडे यांची ‘ठुमरी कथा’ ही ध्वनिमुद्रिका ऐकत असताना त्यांनी रंगवलेली विरहिणी काळजाचा ठाव घेऊन गेली. शब्द होते : ‘‘पिया बिन नागन है काली रैन...’’ आणि माझ्या मनात अचानक विचार आला : एका अल्बममध्ये साधारण आठ गाणी असतात. या आठ गाण्यांमधून आपण स्त्रीमनाचे वेगवेगळे विभ्रम सादर केले, तर आपला हेतू साध्य होईल. यातून जान्हवीच्या आवाजातली नाट्यमयताही प्रभावीपणे गाण्यामध्ये वापरली जाईल आणि स्त्रीमनाचे विविध विभ्रम दाखवताना तिच्या आवाजातल्या वेगवेगळ्या भावनिक छटाही सादर करण्याची संधी मिळेल. ‘कलहान्तारिका’. नवऱ्याशी किंवा प्रियकराशी भांडून आता पश्चात्ताप झालेली ही नायिका म्हणजे ‘कलहान्तारिका’. हे गीत लिहिण्याकरिता मी गुरू ठाकूर या माझ्या हरहुन्नरी मित्राला विनंती केली. गुरू हा नुसताच एक गीतकार नसून एक अभिनेता, नाटककार, लेखक आणि चित्रकारही आहे. गुरूच्या गाण्यांमध्ये आपसूक एक चित्र, एक कथा, डोळ्यासमोर उभी राहते असा मला अनुभव आहे. ‘कलहान्तारिका’ म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर काय येतं ते मी गुरूला थोडक्यात ऐकवलं. दोन दिवसांतच गुरूनं माझ्यासमोर गाणं ठेवलं.
व्याकुळ डोळे अता मागती भेट तुझी ओझरती
लागले मन परतीच्या वाटेवरती!

वळीव वेडा आठवणींचा रोज अताशा भिजवून जातो
अर्ध्या रात्री, अवचित गात्री स्पर्श तुझे मोहरती
मन परतीच्या वाटेवरती!


शब्द वाचल्यावाचल्या माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. ट्रेनच्या प्रवासाचं चित्र. मनाचा परतीचा प्रवास. या गीतानं माझी झोप उडवली. मला चित्र तर दिसत होतं; पण सूर दिसत नव्हते. पुन्हा एकदा मी चाल बांधायला शब्दांचंच साहाय्य घेतलं. ‘मन परतीच्या वाटेवरती’ या शब्दांना उतरत्या स्वरांमध्ये बांधलं. ही चाल बांधताना मी ‘मन परतीच्या वाटेवरती’ हे दोन शब्दच वेगवेगळ्या तऱ्हेनं म्हणून पाहिले. मिथिलेश पाटणकरनं या गाण्याचं संगीत नियोजन करताना एका सुफी गाण्यासारखा ठेका लावला आणि माझ्या मनात विचार चमकून गेला. हे गाणंच सुफी अंगानं का जाऊ नये? नायिकेची पश्चात्तापाची भावना आणि एका सुफी संताची प्रेमाची शिकवण यांची सांगड घातली, तर या गीताला एक वेगळाच रंग येऊ शकतो.

‘लागले मन परतीच्या वाटेवरती...’ या ओळीच्या आधी पुन्हा एकदा एका पुरुषाच्या आवाजात काही ओळी येऊ शकतात. सुफी सिद्धांत असतील तर हिंदी किंवा उर्दूमध्ये या ओळी असू शकतात असंही वाटलं. आणखी एक विचार मनात आला.
‘मन परतीच्या वाटेवरती’ यातल्या ‘वाटेवरती’ या शब्दाला हिंदीत यमक मिळालं, तर यांचा संयोग सुंदर वाटेल. एका गीताचं रूपांतर मनाच्या पडद्यावर पडणाऱ्या चित्रामध्ये होतं... आणि ते मनाच्या पडद्यावर पडलेलं चित्र तुम्हाला दुसरं गीत सुचवतं : हा एक विलक्षण सृजनाचा अनुभव मला हे गीत देऊन गेलं. एकदा गाडीतून प्रवास करताना आर. डी. बर्मन यांचं ‘ख़ामोशसा अफ़साना पानी से लिखा होता’ हे गीत रेडियोवर लागलं होतं. गुलज़ार यांचे शब्द आणि आरडींचं संगीत यामधून एक चित्र डोळ्यासमोर रेखाटलं गेलं. समुद्रात असणारी आक्रमक लाट किनाऱ्यापर्यंत येईतोवर शांत झालेली आहे. ते चित्र डोळ्यासमोर आलं आणि त्याचबरोबर एक चालही आपसूक डोक्यात आली. चालीबरोबरच शब्दही आले :
कब रुठा लहरों से किनारा, कब रुठी सावन से धरती
लागले मन परतीच्या वाटेवरती!

मूळ गाभा सापडला; पण संगीत नियोजनाचं काय हा प्रश्न होताच. मिथिलेश आणि माझ्यात खूप विचारमंथन आणि बरीच चर्चा झाल्यावर आमचा एक-एक निर्णय पक्का होत गेला. आतुर सोनी यानं या गीताचं (आणि ‘जान्हवी’ या अल्बममधल्या जवळजवळ सगळ्याच गीतांचं) तालनियोजन केलं आहे. त्यानं डफाचा आवाज या गाण्यात वापरून संपूर्ण गाण्यालाच एक सुफी रंग दिला. विजय तांबेच्या बासरीनं आणि जितेंद्र ठाकूर यांच्या व्हायोलिननं तर हा प्रवास अक्षरश: जिवंत केला. बासरी आणि व्हायोलिनच्या सुरांनी या गाण्यातल्या नायिकेचं दु:ख अधिक तीव्रपणे मांडलं. गुरूनं गाणं चार कडव्यांचं लिहून दिलं होतं; पण कुणालाच ते कमी करावंसं वाटत नव्हतं.

गाण्याचा संपूर्ण ट्रॅक तयार झाल्यावर जेव्हां जान्हवी गाण्यासाठी आली, तेव्हा संगीत ऐकूनच तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. जसं हे गाणं मला ‘दिसलं’ होतं, तसंच ते तिला दिसतंय याची मला खात्री झाली. आमच्या मन:पटलावर कदाचित वेगवेगळी चित्रं उमटली होती, त्यातले रंगही वेगवेगळे दिसत होते; पण भावना एकच पोचली होती यात शंका नव्हती. आता तिच्या मन:पटलावरची चित्र अनुवादित करायची जबाबदारी तिची होती.
जान्हवी संपूर्ण गाणं डोळे बंद करून गायली. कारण माझ्या चालीतलं ‘चल’चित्रं तिच्या मनःपटलावर ‘प्ले’ होत होतं.
नकोस थांबु पैलतटावर पुन्हा मांडु ये डाव पटावर
पुन्हा सावरू जरी बहरले अडसर अवतीभवती
लागले मन परतीच्या वाटेवरती

चुकले कोठे कधि कुणाचे या साऱ्याचे नको खुलासे
जखमांवरल्या खपल्या सावध निमित्त शोधित फिरती
लागले मन परतीच्या वाटेवरती

विरहाच्या वणव्यात जळाले तुझ्या नि माझ्या मधले कुंपण
आणि जळाले माझे ‘मी’ पण शरण तुला मी पुरती
लागले मन परतीच्या वाटेवरती

प्रत्येक गाणं हा अखेरीस मानसचित्रांचा अनुवाद असतो आणि त्यातून जन्माला येते ती अनुभूती!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com