Dental Health Tips: हेल्थ इज वेल्थ : दातांचे सौंदर्य जपणे हे उत्तमच!

दात हा आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे. आपण त्याकडे पण सहसा लक्ष देत नाही व अगदी सहजपणे बोलून जातो, एखादा दात दुखत असेल तर तो दात सरळ काढून टाका.
Dental Implant
Dental Implantesakal

लेखक : डॉ. विशाल जाधव

दात हा आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे. आपण त्याकडे पण सहसा लक्ष देत नाही व अगदी सहजपणे बोलून जातो, एखादा दात दुखत असेल तर तो दात सरळ काढून टाका. निसर्गाने निर्माण केलेल्या मानवी शरीरामध्ये प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे.

डोळे, नाक, कान, हृदया सारखेच दातांचेही महत्त्व निश्चितपणाने आहे. (saptarang latest marathi article by dr vishal jadhav on Health Wealth best to maintain beauty of teeth nashik news)

Dental Implant
निरागस ‘चुंबन’गिरी!
esakal

दात या विषयावर अनेक प्रकारे आपण आपल्या जीवनात संवाद करत असतो. यासाठी काही वाक्यप्रचार देखील प्रसिद्ध आहेत. गंमतीने दात घशात जाणे, दात कोरणे असे वाक्यप्रचार इतरांना उद्देशून वापरले जातात.

बोलता बोलता कोणाच्या तोंडातून निसटलेला दात किंवा सामाजिक कार्यक्रमप्रसंगी जेवताना खाली पडणारे दात नेहमीच अनेकांसाठी विनोदाचा विषय राहिला आहे. परंतु ज्यांना दात नाहीत, त्यांच्यासाठी हे जीवन जगण्याचे सर्वांत मोठे माध्यम ठरते.

काही वर्षांपूर्वी ज्यांना दात नव्हते त्यांना दाताची कवळी हा एकमेव पर्याय होता. त्यात काही लोकांनी आनंदाने दात वापरण्याची सवय केली होती. या लोकांनी त्यांची तो जीवनशैलीचा भाग बनवून घेतला होता. पण कवळी बोलताना, हसताना, जेवताना सांभाळणे हे अत्यंत जिगरीचे काम होते.

काही रुग्णांना दाताची कवळीशी जुळवून घेणे फार कठीण जात होते. वापरत नसताना त्यांना नेहमी पाण्यात ठेवणे त्या दातांची नियमित साफसफाई करणे. त्यांच्यासोबत खाण्याची सवय लावणे. हा त्रास नवीन दातांच्या वापरण्यासाठी खूप मोठा होता. त्यापैकी काहींनी तर कधीच अशा दातांचा वापर केला नाही.

अशावेळी त्या रुग्णांना जीवनात त्रासाला सामोरे जावे लागले. त्यांचे आयुष्य कष्टमय ठरले. काढता येण्याजोगा दातांच्या दीर्घकालीन वापरामुळे जबड्याचे हाड मोठ्या प्रमाणात लोकांना गमवावे लागले. अयोग्य दातांमुळे तोंडात फोड येणे, जबड्यांची सांधे दुखी, तोंडातील बरे न होणारे व्रण इत्यादी समस्या निर्माण झाल्या.

व्यक्तीच्या बोलण्यावरही त्याचा परिणाम झाला. दातांच्या थर-कापामुळे अन्न खाण्यास मर्यादा आल्या. सामाजिक कार्यक्रमांमध्ये रुग्णांना अधिक जागरूकता बाळगावी लागली. या सर्व समस्यामुळे दातांचा फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक होऊ लागला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Dental Implant
झळा लागल्या जीवा!

उतार उतारवयामध्ये दातांची समस्या निर्माण होणे, हे जवळपास निश्चित आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक या समस्येपासून त्रस्त असतो. दातांची समस्या असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. ज्या रुग्णांच्या मुखामध्ये दात नाहीत, त्यांच्या हिरड्या व हाडांची झीज अत्यंत वेगाने होते.

यासाठी डेंटल इम्प्लांट ही एक प्रकारची नवसंजीवनीच आहे. यामध्ये बोनमध्ये स्क्रू टाकून दातांचे री-कन्स्ट्रक्शन केले जाते. टायटॅनियम स्क्रू पेशी व हाडांमध्ये एकजीव होऊ दिले जातात. सदर स्क्रू नैसर्गिक दातांच्या मुळाचे काम करतात.

हा स्क्रू हाडांच्या लेव्हल पेक्षा दोन एमएम खोल टाकून एक महिना त्यास एकजीव होऊ दिले जाते. त्यानंतर दातांचा क्राऊन बसविला जातो. अगदी नैसर्गिक दात वाटावे असेच ते दिसतात. इनप्लांट केल्यामुळे हाडांची झीज होण्याचा वेग हा कमी होतो.

रुग्णाची अन्न चावण्याची प्रक्रिया सुरळीत होऊन उतार वयामध्ये ज्येष्ठ नागरिक सकस आहाराचा उपभोग घेऊ शकतात. इनप्लांट केल्यामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आकारही बदलतो. जबड्याचा सांधा व आजारापासून दूर राहता येतं.

डेंटल इम्प्लांट करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. रुग्णाची फिटनेस टेस्ट होणे गरजेचे आहे. विशेष करून ज्यांना अग्रेसिव्ह डायबिटीस व सिव्हीयर कार्डियाक समस्या आहे अशांचे इम्प्लांट करणे धाडसाचे ठरू शकते.

सध्या दंत क्रांती झाल्यामुळे इम्प्लांट ही संकल्पना उदयास आली. दुधाचे दात व कायमचे दात व त्यानंतर इम्प्लांट फिक्स दात हा ज्येष्ठ नागरिकांना एक मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे त्यांच्या जीवनात एक नवीन संजीवनी निर्माण झाली आहे. पारंपरिक दातांना अलविदा करण्याची वेळ आली.

फुल माऊथ डेंटल इम्प्लांट केल्यास दातांना बसवण्यासाठी एक मजबूत स्थिर पाया दिला जातो. जबड्याच्या हाडात बसवलेले रोपण नांगरासारखे काम करते व दातांना उत्कृष्ट पकड देतात.

याद्वारा केलेले दातांचे रोपण हे काढत्या येण्याजोग्या दातांपेक्षा अधिक चांगले बोलण्याची क्षमता देतात. स्वच्छता आणि देखभाल अतिरिक्त फायदेही आहेत. जेवण चावण्याची व चघळण्याची प्रक्रियेत जबड्याच्या अंतर्गत हाडांना हानी पोहोचत नाहीत.

Dental Implant
उत्कट संवेदनांचा आवेग

पारंपरिक पद्धतीत पूर्ण दातांना स्थिर आधार मिळत नाही आणि त्यामुळे काही कालावधीत रुग्ण त्यांच्या दातांचा वापर करणे बंद करतात. इम्प्लांट राखून ठेवलेल्या दातांचे पारंपरिक दातांच्या तुलनेत असंख्य फायदे आहेत आणि आता ही एक स्थापित उपचार पद्धत जगभर मानली गेली आहे.

इनप्लांटच्या यशस्वी परिणामामुळे रूग्ण आता पारंपरिक काढता येण्याजोग्या दातांऐवजी इम्प्लांट ठेवलेल्या दातांना प्राधान्य देतात.

डेंटल इम्प्लांटमुळे सौंदर्यात देखील लक्षणीय भर पडते. तसेच,ते चेहऱ्याच्या स्नायूंच्या टोनला पूरक ठरते. इम्प्लांट-रिटेन केलेले डेंचर्स रूग्णांची मुख स्वच्छता राखण्यास मदत करतात.

अशा प्रकारे, हिरड्यांचे आरोग्य चांगले राखले जाते आणि दातांचे कार्य दीर्घ कालावधीसाठी होते. रुग्ण हलक्या ते मध्यम कडक अन्नपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. सहज अन्नग्रहण झाल्यामुळे रुग्णाचे सामान्य आरोग्यही सुधारते.

इन प्लांटमध्ये पारंपरिक दातांच्या तुलनेत पारंपरिक दातांच्या तुलनेत किंचित बदलू शकते. कारण रोपण जोडण्यासाठी अतिरिक्त तयारी आवश्यक आहे. जबड्याच्या हाडांच्या आरोग्याप्रमाणे विविध प्रकारचे दंत रोपण करता येते. 

पारंपरिक काढता येण्याजोग्या पूर्ण दातांच्या तुलनेत इम्प्लांटसह दातांचे अनेक फायदे आहेत. पारंपारिक दातांच्या तुलनेत इम्प्लांट-रिटेन केलेले डेन्चर अधिक दृढ, स्थिर, सौंदर्यपूर्ण, आरामदायी आणि त्रासमुक्त असतात. इम्प्लांट-समर्थित दातांमुळे भाषण सुधारते, चावण्याची क्षमता अधिक चांगली असते आणि जबड्याचे हाड उत्तम आरोग्य राखते.

इम्प्लांट-रिटेन केलेल्या दातांद्वारे प्रदान केलेल्या स्थिर पायाद्वारे चघळलेले अन्न अन्नाचे चांगले पचन आणि रुग्णाचे सामान्य आरोग्य सुधारण्यास मदत करते. इम्प्लांट समर्थित दातांचे अधिक अंदाजे, यशस्वी आणि विश्वासार्ह परिणाम आहेत आणि म्हणूनच बहुतेक रुग्णांना ही ट्रिटमेंट पसंत पडते. 

(लेखक 'फेलो इन ओरल इनप्लांट' पदवीप्राप्त डॉक्टर आहेत.)

Dental Implant
निरोपापूर्वीचा महत्वाचा निरोप...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com