एज्यु कॉर्नर : मुलांचे मानसशास्त्र समजून घ्यायला हवे

K. S. Azad
K. S. Azadesakal

लेखक : के. एस. आझाद

माणसाचे मन हा नेहमीच मानवाच्या जिज्ञासाचा विषय राहिलेला आहे. ग्रह, तारे, पशु, पक्षी यांच्या विषयीच्या जिज्ञासेतून भौतिकशास्त्र व जीवशास्त्र निर्माण झाली. तशी स्वतःच्या विषयाच्या जिज्ञासेतून मानसशास्त्र म्हणजेच सायकॉलॉजी ही शाखा निर्माण झाली.

स्वतःविषयीची जाणीव माणसाला अंतरी आणि बाह्य अशी दोन कप्पे उपलब्ध करून देते. त्यामधील भेद लक्षात येत असतानाच बाह्य जगाचे असणे आणि त्याचा आपल्याला अनुभव येणे, यात फरक आहे, हेही माणसाच्या लक्षात आले. (saptarang latest marathi article by KS Azad on Edu Corner Childrens psychology should be understood nashik news)

K. S. Azad
लढणारा कार्यकर्ता

मानसशास्त्रात जसजसे नवीन विचार निर्माण होऊ लागले, तसतसे या शास्त्राच्या शाखा ही वाढत गेल्या. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला विविध टप्प्यांवर मानसशास्त्राची जोड दिली जाते. यात मुलांचे मानसशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.

कारण मुले ही उद्याची पिढी असून देशाचे भवितव्य आहे. जर ही पिढी तणावाखाली असेल तर भविष्यात तीव्र स्पर्धेला ही कशी तोंड देणार? यामुळे प्रत्येक मुलाचे मानसशास्त्र त्याची मानसिक सायकल समजून घेण्याची गरज आहे.

मानसशास्त्राच्या अनेक शाखा विस्तारल्या, असंख्य प्रयोग झालेत आणि माणसाच्या अंतरंगावर देखील खूप खल झाला. तरी मुलांच्या मनाकडे सुरुवातीला तितकसे लक्ष दिले गेले नाही. फार फार तर बुद्धी आणि त्याचा विकास जोडणाऱ्या बुद्धांक चाचण्या म्हणजेच आयक्यू टेस्ट पुढे आल्या.

फ्रान्समध्ये कमी आयक्यू असणाऱ्या मुलांच्या वेगळ्या शाळा निर्माण होण्यासाठी मदत झाली. स्पिनरसारख्या अमेरिकन शास्त्रज्ञाने मनुष्याचे बालकाचे वर्तन हे त्याचे मन जाणण्याचा एकमेव मार्ग असल्याचे म्हटले. मनातल्या सर्व गोष्टी वर्तमानात दिसतीलच असे नाही.

हा विचार पुढे यायला कित्येक दशके जावे लागले. मुलांच्या मनात विचार आणि भावना कशा विकसित होतात? त्या कशा व्यक्त होतात? त्याचे इतर माणसांची वातावरणाशी संबंध कसे दृढ होतात? बालक कशी शिकतात?

त्यांची मनोगते ओळखण्याची साधने कोणती याविषयी त्याकाळी फारसे बोलले गेले नाही? मुलांच्या मनोविश्वास डोकावण्याच्या सभोवतालच्या परिस्थितीचा आणि त्यांच्या मोठ्यांशी होणाऱ्या आंतरक्रियांचा मुलांवर होणारा परिणामाचा अभ्यास डॉ. ऐना फ्राईड प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वप्रथम केला.

K. S. Azad
समज आणि उमज...

खेळणी, चित्र, गोष्टी, कथा व संवाद अशा विविध माध्यमातून अनेक मुलांना त्यांनी बोलते केले. मुलांच्या मनोविकासात, व्यक्तिमत्व सशक्त होण्यात, त्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा, मायेच्या स्पर्शाचा, प्रेमाच्या नात्यांचा वाटा केवढा मोलाचा असतो.

हे त्यांनी दाखवून दिले. आजही तिने विकसित केलेली प्लेथेरपी खेळामधून मानसोपचारसारखी तंत्र छोट्या-मोठ्या मुलांच्या मनोविकासात्मक समस्यांची ओळख करून द्यायला त्यांना उपचार द्यायला वापरली जातात.

लहान मुलांची शब्दसंपत्ती प्री स्कूल वयात फार भराभर वाढते. वाढत्या वयानुसार सर्व प्रकारच्या शब्दांचा वापर बालके करू लागतात. रंगविषयक शब्द पाचव्या वर्षी शिकण्यात आलेले असतात. कालवाचक शब्दांचाही वापर करण्यात येतो.

बारापर्यंत वस्तू व आकडे त्यांना मोजता येतात, सहाव्या वर्षी वाक्यरचनेचे अनेक प्रकार त्यांच्या बोलण्यात आढळतात. तीन-चार वर्षांपर्यंत बालकांचे बोलणे बोबडे असते. पण आईवडिलांच्या स्पष्ट शब्दोच्चारांचा आदर्श ठेवून हे उच्चार सुधारलेही जातात.

प्रारंभी बालकांचे बोलणे आत्मकेंद्री असते; पण त्यांचा सामाजिक परिसर जसजसा मोठा होतो. तसतसे बोलणे अधिक समाजानुकूल होते.

तीन ते चार वर्षांच्या वयात भावनात्मकता व आक्रस्ताळेपणा ही वैशिष्ट्ये बालकांच्या वागण्यात आढळतात. सहा वर्षांच्या वयात बालके खूप खेळू लागतात. साहजिकच त्यांची भावनात्मकता वाढते.

हवी ती वस्तू शीघ्र व सहज मिळविण्यासाठी रागाचा चांगला उपयोग होतो, त्यांच्या हे चांगलेच अंगवळणी पडलेले असते.

अनेक कारणांनी घरच्या वातावरणात संघर्ष उत्पन्न झाल्यामुळे किंवा इच्छांचा अवरोध झाल्यामुळे बालके रागावतात आणि लाथा झाडणे, हातपाय आपटणे, जमिनीवर लोळणे, शरीर ताठ करणे इ. प्रकारचे आक्रस्ताळे वर्तन करतात.

आक्रस्ताळेपणा सहाव्या वयात कमी होऊ लागतो. वयाच्या वाढीबरोबर भीती वाढत जाते. आईच्या व बालकांच्या भीतीविषयांत बरीच समानता आढळते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

K. S. Azad
रुग्णस्नेही ‘केवट’

त्यानंतरच्या वयोगटात उतावळेपणा हा मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. या काळात मुलांचा चेहरा अधिक प्रमाणबद्ध होतो. पण उंचीच्या मानाने स्नायूंचा फारसा विकास होत नसल्यामुळे ती हडकुळी व अनाकर्षक दिसतात.

म्हणजे मोठे दिसणारे नवीन दात, केस रचना कशी असावी. याबद्दलचा संभ्रम त्यामध्ये निर्माण झालेला असतो. या वयोगटातच स्पोर्ट्समध्ये सहभाग होण्याचे प्रमाण अधिक आहे. अभ्यासात व खेळांमध्ये काही जर प्राविण्य मिळवले किंवा त्याबद्दल रिवार्ड मिळाला तर त्याचा अभिमान वाटतो.

रायटिंग, रीडिंग, काउंटिंग, ड्रॉईंग तसेच अनुकरणाचे कौशल्य या वयातच वाढते. ज्या बालकांमध्ये हे कौशल्य अधिक आहे, त्यांचे सामाजिक भान अधिक चांगले असल्याचे भविष्यात आढळते. स्टडी, रीडिंग व लिसनिंग यामुळे बालकांची शब्द संपत्ती म्हणजेच वोकॅबलरी भराभर वाढू लागते.

या वयातच मुले व मुली सांकेतिक भाषेचा म्हणजेच कोड लँग्वेजचा वापर करू लागतात. वाढत्या वयानुसार बालकांची भाषा अधिक बंदिस्त होते. बहुतेक बालके जरुरीपेक्षा मोठ्याने बोलतात. बोलण्याविषयी सुरुवातीला स्वतःसंबंधी असतात.

वाढत्या वयानुसार इतरत्र बाबींबद्दल जास्त बोलतात. इतरांवर टीका करणे, टिंगल टवाळी करणे, या वयातच बरेचसे आढळते. वयाच्या नवव्या वर्षापासून वाचनाची आवड निर्माण होते.

वाढत्या वयानुसार भावनात्मक होतात दहा-बारा वर्षांच्या काळात भावा-भावांमधील भांडणांना सुरुवात होते. राग आला की मुली रडू लागतात तर मुले वस्तू फेकतात किंवा लाथडतात. हा राग धूसपुसण्यातूनही व्यक्त होतो.

K. S. Azad
एक झोका सुखाचा!

सामान्य गोष्टीबद्दलची व वैयक्तिक सुरक्षिततेची भीती व चिंता वाढते. या वयात स्वातंत्र्याची इच्छा तीव्र असते. त्यामुळे इतरांशी तुलना केली जाते. उपदेश केला जाण, चीड निर्माण होणे व वयानुसार पुढे जिज्ञासा चांगलीच अभिव्यक्त होऊ लागते.

वरील सर्व लक्षणे मुलांच्या या वयोगटात कमी अधिक प्रमाणात वयाच्या टप्प्यानुसार मागेपुढे कमी मध्यम व अधिक प्रमाणात आढळतात. पण गेल्या चार वर्षांत कोरोना कालावधीनंतर अचानक होणारे बदलही जाणू लागले आहे.

प्री स्कूल व स्कूल वयोगटानुसार प्रवेश व्हायला हवे होते, त्यानुसार झाले नाही. अनेकांचे शालेय जीवनात अचानक खंड निर्माण झाला. जवळपास दोन वर्ष शालेय जीवनापासून सर्वच मुले वंचित राहिली. त्यामुळे शाळेच्या वातावरणाची सवय नाहीशी झाली.

काहींना अधिक वयाचे झाल्यानंतर शाळेत जावे लागले. तर काहींचे सुरुवातीचे वर्ष वाया गेली. यामुळे मुलांना घरातच थांबावे लागल्यामुळे ती बंदिस्त झाली. यामधून एकलकोंडेपणा, मोबाईलचा अतिवापर त्यातून निर्माण होणारे मानसिक व शारीरिक आजार होण्याची शक्यता अधिक बळावली.

यामधून पालक व शाळा व्यवस्थापन व यांनी मुलांना योग्य समजून घेऊन सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

(लेखक हे क्लीफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक आहेत)

K. S. Azad
विसरल्या जाती, वितळल्या पाती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com