दिवाळी : एक अनोखे प्रकाशपर्व

Rajaram Pangavane
Rajaram Pangavaneesakal
Updated on

लेखक : राजाराम पानगव्हाणे

दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. ‘दीप’ म्हणजे ‘दिवा’ आणि ‘आवली’ म्हणजेच ‘ओळ’. याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्यावेळी प्रजेने दीपोत्सव केला.

हिंदू धर्मातील सण, उत्सव, व्रते यामागे शास्त्र आहे. त्याचप्रमाणे वर्षाचे १२ महिन्यांत येणारे सण आणि त्या काळात असणारे ऋतुचक्र यांची सांगड घालून त्याचा मनुष्याला लाभ व्हावा, हा उदात्त हेतू यामागे आहे.

प्रत्येक सणाचे शास्त्र समजून घेऊनच सण साजरे केले तर त्याचा लाभ होईल. युगानुयुगे चालत आलेल्या या सणाचे स्वरूप मात्र बदलत चालले आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. (saptarang latest marathi article by rajaram pangavane on Diwali unique festival of lights nashik)

esakal

हिंदू संस्कृतीत सणांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक सण हजारो वर्षांपासून आगळ्यावेगळ्या पद्धतीने विविध ठिकाणी उत्साहात साजरे होत आहेत. त्यांचे महत्त्व आजही अधोरेखित आहे.

वर्षाच्या सुरुवातीपासून होणारे सण ते अखेरीपर्यंत प्रत्येक सणाचे वेगवेगळे महत्त्व आहे, त्याचा संबंध वातावरणातील होणारा बदल, आपल्यात निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा, सर्वांनी एकत्र यावे, भक्ती व सेवाभाव अशा अनेक भावना त्याच्याशी जोडलेल्या आहेत.

या सणांमध्ये सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे दीपावली होय. हिंदू संस्कृतीत या सणाला सणांचा राजा (किंग ऑफ फेस्टिवल) असेही म्हणतात.

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. विविध रंगांचा आणि दिव्यांचा सण म्हणून दिवाळी म्हणजेच दीपावली साजरी करण्यामागे शास्त्र आहे.

ते समजून घेऊन कृती केल्यास त्याचा अधिकाधिक लाभ होईल. प्रत्येक प्रांत, देश यात तेथील चालीरीतीनुसार सण साजरा होतो.

Rajaram Pangavane
Diwali Recipe: दिवाळीत तांदळाच्या पिठापासून बनवा खुसखुशीत हा गोड पदार्थ, ही आहे सोपी रेसिपी

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. येथील प्रत्येक जण प्रकाश आहे. हा सण सर्व भारत, नेपाळ, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, मॉरिशस, सुरीनाम, त्रिनिदाद या देशांमध्येही साजरा केला जातो. दिवाळीचे दुसरे नाव दीपावली.

हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घरा-अंगणात लावल्या जातात म्हणून तिचं नाव दीपावली. दिवाळीची या सणाची सुरवात वसुबारसेपासून होते आणि भाऊबीज साजरी केल्यावर दिवाळीची सांगता होते.

सर्व आबालवृद्ध, मुले, स्त्रिया यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटले, की आवराआवर, रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूंची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हेही या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य.

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश. आपली थोर संस्कृतीही सर्वांवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय, वसूबारस यादिवशी आपण गाय आणि वासरू यांची पूजा करतो. त्यांना गोड घास खाऊ घालतो.

दूध-दुभत्यासाठी होणारा गायीचा उपयोग, शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धणे-गुळाचा प्रसाद यालाही फार मोठे महत्त्व आहे. याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा, असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस.

या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे. ती अशी, की श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदीशाळेतल्या १६ हजार १०० कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस. दुष्टांचा नाश आणि मुक्तीचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.

Rajaram Pangavane
Diwali Vacation: दिवाळीला परदेशात सुट्ट्यांचा प्लॅन करताय? 'ही' आहेत बजेट डेस्टिनेशन्स

अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्य अमावास्येला सायंकाळी घरोघरी, दुकानांत, सोन्या-चांदीच्या पेढ्यांत, कार्यालयांत लक्ष्मीपूजन केले जाते.

घरातलं सोनं-नाणं, रोकड यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांचे पूजन करतात. या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्यलक्ष्मी (केरसुणी) हिचीही पूजा करतात. लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला जातो.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा. साडेतीन मुहूर्तांतला एक मुहूर्त. या दिवशी अनेक नवे प्रकल्प सुरू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच भाऊबीज असे म्हणतात. बहीण-भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस.

दिवाळीच्या सणातला लहान मुला-मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदील तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, सायंकाळी दारापुढे छान-छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे. दीपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो.

परस्परांना भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन आनंद दिला-घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे.

जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी, सुखद. दीपावलीच्या अनेक सुखद आठवणी पुढे अनेक दिवस मनात रेंगाळत राहतात.

युगानुयुगे चालत आलेल्या या सणाचे स्वरूप मात्र बदलत चालले आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. हिंदू धर्मातील सण, उत्सव, व्रते यामागे शास्त्र आहे.

त्याचप्रमाणे वर्षाचे १२ महिन्यांत येणारे सण आणि त्या काळात असणारे ऋतुचक्र यांची सांगड घालून त्याचा मनुष्याला लाभ व्हावा, हा उदात्त हेतू यामागे आहे. प्रत्येक सणाचे शास्त्र समजून घेऊनच सण साजरे केले तर त्याचा लाभ होईल.

दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. ‘दीप’ म्हणजे ‘दिवा’ आणि ‘आवली’ म्हणजेच ‘ओळ’. याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी.

चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला, अशी कथा आहे. यानुसार पूर्वापार हा सण साजरा केला जात आहे.

आकाशदीप लावण्यामागील शास्त्र त्रेतायुगात आकाशदीपाची संकल्पना जन्माला आली. प्रतिवर्षी दिवाळी हा सण आला, की घरोघरी आकाशदीप (आकाशकंदील) लावतात. आकाशदीप लावण्याची प्रथा ही पूर्वापार चालत आलेली आहे.

या रूढी, परंपरा काळानुसार बदलत गेल्या आणि त्याचे असणारे महत्त्व कुठेतरी कमी होत आहे. पण, त्यामागची भावना, प्रेम हे बदलणाऱ्या स्वरूपातही काही प्रमाणात टिकून आहे.

Rajaram Pangavane
Diwali 2023 : यंदाच्या दिवाळीला घराला द्या सुंदर लूक, अशा पद्धतीने सजवा तुमचे घर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com