दृष्टिकोन : लोककला जिवंत ठेवा, प्रोत्साहन द्या!

ज्या लोककलांच्या माध्यमातून प्रबोधन व मनोरंजन झाले, त्या पारंपारिक लोककलांकडे दुर्लक्ष नको, त्या जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे.
Rajaram Pangavhane
Rajaram Pangavhaneesakal

लेखक : राजाराम पानगव्हाणे

लोककला हा आपला महाराष्ट्राचा, मराठी संस्कृतीचा आत्मा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मनोरंजनाची अनेक साधने अत्यंत सहज पद्धतीने टच स्क्रीनवर उपलब्ध आहेत.

मात्र ज्या लोककलांच्या माध्यमातून प्रबोधन व मनोरंजन झाले, त्या पारंपारिक लोककलांकडे दुर्लक्ष नको, त्या जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे.

लावणी, तमाशा, बहुरूपी, गोंधळ, वासुदेव, पोवाडा, कीर्तन, वासुदेव अशा अनेक कला आणि कलावंत आहे, ते आज लोप पावत चालले आहेत.

काहीमार्फत जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नही केले जातात. आपापल्या परीने प्रत्येकाने या लोककला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. (saptarang latest marathi article by rajaram pangavhane on Keep folk art alive promote it nashik news)

लावणी, तमाशा, बहुरूपी, गोंधळ, वासुदेव, पोवाडा, कीर्तन, वासुदेव अशा अनेक कला आणि कलावंत आहे, ते आज लोप पावत चालले आहेत.
लावणी, तमाशा, बहुरूपी, गोंधळ, वासुदेव, पोवाडा, कीर्तन, वासुदेव अशा अनेक कला आणि कलावंत आहे, ते आज लोप पावत चालले आहेत. esakal

पूर्वी अगदी पहाटेच्या प्रहरी रामनामाचा महिमा गाणाऱ्या वासुदेवाची ललकारी कानावर पडायची, त्यानंतर लोकांची सकाळ उजाडत असे. दिवसभराच्या कष्टाने दमलेल्या माणसांची पावले सायंकाळ झाल्यावर देवळाकडे वळायची.

भजन आणि कीर्तनात रंगणारी ती माणसे कधीकधी कीर्तन, भारुडातील प्रसंगांनी मनमोकळेपणे हसत असत. तमाशा म्हटले, की लावणीने देहभान हरपून जायचे, पोवाड्यांनी अंगावर रोमांच उभे राहायचे.

धकाधकीच्या, कष्टाच्या, दुःखाच्या क्षणांनी भांबावलेल्या मराठी माणसाला आपल्या कलांद्वारे मोहित करण्याची किमया साधणाऱ्या या लोककला आणि लोककलावंत आता काळाच्या पडद्याआड जाऊ लागले आहेत, ही मन खिन्न करणारी बाब आहे.

लोककलेच्या माध्यमातून मराठी माणसाचे जीवन समृद्ध केले आहे. लोककला या संबंधित संस्कृतीच्या प्रवाहक असतात.

लोककलांमधून लोकजीवन, त्या लोकसमूहाच्या परंपरा, रूढी यांचे प्रतिबिंब उमटत असते. लोकसमूहाचे सांस्कृतिक आणि धार्मिक भावविश्वाचे दर्शनही या लोककलांमधून घडत असते.

Rajaram Pangavhane
आगरझरीची राणी ‘छोटी मधू’

लावणी : गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा संगम असलेली लावणी हा लोकप्रिय कलाप्रकार आहे. तमाशाचा भाग म्हणूनही लावणी सादर केली जाते. शृंगारावर आधारलेल्या लावणीचे मूळ संतांच्या विराण्या, गौळणी, बालक्रीडेचे अभंग यात आढळून येते.

शाहिरांनी या लावण्यांची लज्जत वाढवली. नुसते शृंगारिकच नव्हे; तर भक्तिरस, वीररस, वात्सल्यरस असलेल्या लावण्याही शाहिरांनी रचल्या. लावणीविषयी असे म्हटले जाते, की लवण म्हणजे मीठ आणि मीठाशिवाय जेवणाला चव नाही. त्याप्रमाणे लावणीशिवाय मनोरंजनाच्या कार्यक्रमाला लज्जत येत नाही.

गोंधळी : अंगात तेलकट झबला, गळ्यात देवींची प्रतिमा, कपाळावर कुंकू, गळ्यात कवड्यांची माळ अशी वेशभूषा असलेली व्यक्ती म्हणजे गोंधळी. संबळ आणि तुणतुणे या वाद्यांद्वारे नृत्यही करणारा गोंधळी काकडे पेटवून देवीचे गुणगान करत गोंधळ घालतो.

महाराष्ट्रात गोंधळाला मोठी परंपरा आहे. लग्नसमारंभ किंवा शुभ कार्यामध्ये गोंधळाचा कार्यक्रम केला जातो.

जागरण गोंधळ : गोंधळाबरोबरच जागरणाला महत्त्वाचे स्थान आहे. आपापल्या कुलस्वामीला जागृत करणे म्हणजे जागरण. घरामध्ये शुभकार्यावेळी जागरण गोंधळ घातला जातो. दर वर्षाला किंवा तीन वर्षांनी कूळधर्म कुलाचारावेळी जागरण गोंधळ घातला जातो. या जागरणाची मांडणी गोंधळाप्रमाणेच असते.

वाघ्या आणि मुरळी हे गीत आणि नृत्यामधून कुलस्वामीची स्तुती करतात. श्रद्धा किंवा अंधश्रद्धा हा वेगळा विषय आहे. श्रद्धेसाठी जागरण गोंधळ घालणारे आणि त्यासाठी रात्रभर नृत्य करून घाम घालणारे लोककलाकार आता मोजकेच राहिले आहेत.

बाल्या नृत्य : बाल्या नृत्याला जाखडी नृत्य असेही म्हटले जाते. ‘जाखडी’या शब्दातील ‘खडी’ म्हणजे उभे राहणे. हे नृत्य उभे राहून केले जाते म्हणून त्याला जाखडी असे संबोधले जाते.

बाल्या नृत्य हे नाव पडण्यामागचे कारण म्हणजे कोकणातील ग्रामीण भागात राहणारे शेतकरी एकेकाळी मुंबईत घरगडी म्हणून काम करायचे. त्यांच्या कानात बाली हा दागिना असायचा. त्यावरून ‘बाल्या नृत्य’असे नाव पडले.

Rajaram Pangavhane
जमिनीवरील स्वर्गावर निसर्गाची उधळण

तमाशा : महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककला तमाशाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. तमाशा हा मूळ शब्द अरबी आहे. त्याचा अर्थ दृश्य, खेळ किंवा नाट्यप्रयोग असा आहे. या खेळात गण-गौळण, रंगबाजी आणि वग अशा तीन प्रकारच्या नाट्यांनी रंगत येत असते.

गण म्हणजे गणपतीला केलेले आवाहन. गण संपल्यावर ढोलकी वादन होते. त्यानंतर तमाशातील स्त्रियांचे नृत्य होते. या कलेला राजाश्रय न मिळाल्याने आज अनेक तमाशाचे फड बंद पडले आहेत.

कीर्तन : पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन लोककला प्रकार आहे. काव्य, संगीत, अभिनय आणि काहीवेळा नृत्य यांच्या संगमातून सादर झालेले कथारूप एकपात्री निवेदन म्हणजे कीर्तन. कीर्तन ही एक भक्ती आहे. कीर्तनाला मोठी परंपरा आहे. कीर्तनात नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन, असे दोन मुख्य प्रकार मानले जातात.

नारदीय कीर्तनातून वारकरी, रामदासी, राष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले आहेत. स्वातंत्र्य चळवळीत कीर्तनकारांनी समाज जागृतीचे काम केले. नारदीय कीर्तनात सुरवातीला नमन आणि पूर्वरंग, मध्यंतरात नामजप आणि भक्तिगीत.

लळित : लळित ही एक मऱ्हाटमोळी लोककला आहे. कोकणात नारदीय कीर्तन परंपरेत लळिताचे महत्त्वाचे स्थान आहे.

लळिताचा हेतू सोंगाच्या माध्यमातून तत्त्वज्ञान प्रेक्षकांच्या मनावर बिंबवणे, हा असतो. या सोंगाच्या माध्यमातून करमणूक केली जाते. उत्सावाच्या शेवटी उत्सवदेवता सिंहासनावर बसली आहे, असे मानून तिच्या दरबारात विविध सोंगे आणली जातात.

याला लळित म्हटले जाते. देवतेजवळ मागणे मागून झाल्यावर प्रसाद मागितला जातो, तो श्रोत्यांना वाटण्यात येतो. या सोंगांमध्ये भालदार, चोपदार, वासुदेव, गोंधळी, वाघ्या-मुरळी यांसारखी पात्रे असतात.

भारूड : रूपकांमधून धार्मिक आणि वास्तव तत्त्वज्ञान सांगणारी लोककला म्हणजे भारूड. समाजाला समजेल अशा भाषेत तत्त्वज्ञान सांगून सदाचार आणि नीतीवर भर देणारे असे भारूड आहे. जीवनाचे अवलोकन आणि चिंतन भारुडांमधून व्यक्त झालेले दिसते.

संतांनी समाजप्रबोधनपर भारुडे रचून लोकांमध्ये प्रबोधन केले. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव या संत एकनाथपूर्व आणि संत तुकाराम आणि संत रामदास या संत एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारुडे रचली.

संत एकनाथांनी भारुडात विविधता आणली. त्यांनी भारुडांतून आध्यात्मिक अनुभव सोप्या आणि साध्या भाषेत मांडला. भारुडाचे भजनी भारूड, सोंगी भारूड आणि कूट भारूड असे प्रकार मानण्यात येतात.

आता भारूड ही लोककला लुप्त पावल्यासारखी झाली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात करमणुकीची अनेक साधने सहज उपलब्ध असल्यामुळे ही कला लोप पावली आहे.

Rajaram Pangavhane
गाजलेल्या खटल्याने कष्टकऱ्यांना न्याय

लोककलावंतांना हवा राजाश्रय...

लोककलांप्रमाणे काही लोककलावंतांचे दर्शन आता होत नाही. डोक्यावर मोरपिसांची टोपी घातलेला, पायघोळ अंगरखा, धोतर, कमरेला उपरणे अशी वेशभूषा करून एका हातात टाळ आणि दुसऱ्या हातात चिपळ्या घेतलेला वासुदेव हा एक लोककलावंत.

कृष्णभक्ती गाणारा वासुदेव म्हणजे समाजप्रबोधन करणारी संस्था समजली जायची. अभंग आणि गवळणी गात घरोघरी हिंडणाऱ्या वासुदेवाला आदराचे स्थान होते.

तो स्वतःहून कधीही दान मागत नसायचा. लोक त्याला आपापल्या परीने त्याच्या झोळीत दान टाकायचे. खेडोपाडी आणि शहरांमध्ये एकेकाळी दिसणारा वासुदेव लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

वासुदेव, पिंगळा यांच्याप्रमाणे बहुरूपी, भुत्या, नंदीबैलवाला दैवी शक्तीला आवाहन करणारा, समाजातील विकारांवर कोरडे फटके मारणारा पोतराज किंवा कडकलक्ष्मी, हातात संबळ घेऊन गोंधळ घालणारा गोंधळी, हे काही लोककलावंत लोकांची सेवा करत आले.

लोककला आणि लोककलेचे हे उपासक स्वतः मात्र उपेक्षित आहेत. या उपेक्षितांचे अंतरंग जाणून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी हवाय राजाश्रय. तो मिळाला, तर आपले ही लोककला टिकेल.

(लेखक ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत)

Rajaram Pangavhane
पुन्हा पुन्हा तीच चूक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com