Shubhangi Mane
Shubhangi ManeSakal

...तर तिला आयुष्य लाभेल

सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ अंतर्गत ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.

सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ अंतर्गत ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मवर स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, त्याचबरोबर वैद्यकीय कारणासाठी व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी क्राउड फंडिंग मिळवून देण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक मदतीसाठी क्राउड फंडिंगचे प्रयत्न करण्यात येत आहेत. आजच्या भागात शुभांगी नानाजी माने या मदतीची गरज असलेल्या तरुणीची माहिती...

पुण्याचे रहिवासी नानाजी माने यांचे सर्वसामान्य मध्यमवर्गीय चार जणांचे कुटुंब. दोन मुली, पत्नी व ते स्वतः. माने हे एका खासगी शैक्षणिक संस्थेत लिपिक पदावर काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. सर्व काही सुरळीत असताना दहा वर्षांपूर्वी त्यांची मोठी मुलगी शुभांगी तेरा - चौदा वर्षांची असताना, अचानक आजारी पडली. ताप, उलट्या, अपचन अशी लक्षणं जाणवू लागली. उपचार केल्यावर चार दिवस फरक पडायचा, पण परत पुन्हा त्रास उद्‌भवत असे. नानाजी माने यांनी सर्व तपासण्या केल्यानंतर त्यांना समजले, की मुलीला यकृताचा सोरायसिस झाला आहे.

खेळण्या - बागडण्याच्या वयात शुभांगीला यकृताच्या असाध्य आजाराने ग्रासले होते. सतत आजारी पडत असल्याने शुभांगीला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. माने यांनी आपली सर्व कमाई व कर्ज काढून शुभांगीवर मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर असे समजले, की यकृतापासून हृदयापर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या पोर्टल व्हेन व हेपटिक व्हेन या दोन रक्तवाहिन्या ब्लॉक आहेत. त्यामुळे हृदयापर्यंत रक्तपुरवठा सुरळीत होत नाही. हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी २०१८ मध्ये शस्त्रक्रिया करून कृत्रिम रक्तवाहिन्यांचे रोपण करण्यात आले. २०२० मध्ये त्यातील एक कृत्रिम रक्तवाहिनी खराब झाल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करून कृत्रिम रक्तवाहिनीचे रोपण करण्यात आले. या दोन्ही शस्त्रक्रिया व उपचारांचा खर्च जवळपास दहा लाख रुपये इतका झाला.

सध्या शुभांगी चोवीस वर्षांची असून, तिच्यावर पुण्यातील डेक्कन सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते तिच्यावर यकृत प्रत्यारोपण हाच शेवटचा पर्याय आहे. यकृत प्रत्यारोपणासाठी जवळपास अठरा लाख रुपयांचा खर्च आहे. २८ जूनला शुभांगीवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नानाजी माने यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने यकृत प्रत्यारोपणासाठी एवढी मोठी रक्कम त्यांना उभी करणे शक्य नाही. तसेच आधीच्या दोन शस्त्रक्रियांवर नानाजी माने यांची आयुष्यभराची पुंजी खर्च झाली आहे. आपल्या मुलीवर यकृत प्रत्यारोपण करून, मुलीला नवसंजीवन देण्यासाठी नानाजी माने यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना, स्वयंसेवी संस्थांना व खासगी आस्थापनांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे.

आर्थिक मदतीची नितांत गरज...

शुभांगी नानाजी माने या तरुणीला यकृत प्रत्यारोपणासाठी सामूहिक आर्थिक मदतीची खूप गरज आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर इंडिव्हिज्युअल सेक्शनमध्ये शुभांगी नानाजी माने या तरुणीची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक ttps://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन शुभांगी नानाजी माने या तरुणीची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटणावर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक : ८६०५०१७३६६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com