Marathi Book Review : चित्तर बित्तर’मधून सारिका कुलकर्णी यांनी टिपले माणसांचे स्वभाव आणि जगण्याचे रंग

Marathi Humorous Writing : मराठी विनोदी लेखनात स्त्रियांचे योगदान तुलनेने कमी असताना सारिका कुलकर्णी यांच्या ‘चित्तर बित्तर’ संग्रहातून विविध स्वभावांच्या माणसांचे, त्यांच्या कार्यपद्धतीचे आणि समाजजीवनाचे विनोदी अंग उलगडते.
Marathi Book Review

Marathi Book Review

esakal

Updated on: 

प्रा. रणधीर शिंदे - saptarang@esakal.com

मराठीत विनोदात्म लेखनाची वानवा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यातही स्त्रियांचे विनोदात्म लेखन तुलनेने फार अल्प स्वरूपाचे आहे. या पार्श्वभूमीवर सारिका कुलकर्णी या विविध प्रकारचे विनोदात्म लेखन करत आहेत. अलीकडेच त्यांचा ‘चित्तर बित्तर’ हा व्यक्तिचित्रणात्मक संग्रह प्रकाशित झाला. मराठीत कथनात्मक साहित्य प्रकारात व्यक्तिचित्रणात्मक विनोदाचा आविष्कार काही प्रमाणात झालेला आहे. त्याला पु. ल. देशपांडे यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील विनोद वाचकांच्या मनात रेंगाळत राहिला. स्त्रियांच्या विनोदात्मक आविष्कारावर सामाजिक नियंत्रणाचा प्रभाव असतो, बंधने असतात. त्यामुळे स्त्रियांच्या लेखनातून विमुक्त विनोद प्रकटताना दिसत नाही.

सारिका कुलकर्णी यांच्या या संग्रहातील लेखनात भरगच्च स्वरूपाचा विनोद नसला, तरी अवतीभोवतीच्या माणसांच्या चित्रणातून समाज वाचण्याची त्यांची पद्धत व्यक्तिचिद्धणात्मक आहे. भेटलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभावगुण व व्यक्तींच्या कार्यपद्धतीतून प्रकटलेली व्यक्तिदर्शने हा या लेखनाचा प्रधान विषय आहे. ही बहुतांश माणसे त्यांना त्यांच्या प्रवासात व कामाच्या निमित्ताने भेटलेली आहेत. त्यामुळे त्याचे स्वरूप भटकंतीतील, तसेच सहवासातील व्यक्तिचित्रे असे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com