जलस्रोत मंत्रालय (विज्ञानक्षेत्रे...)

सुधीर फाकटकर sudhirphakatkar@gmail.com
रविवार, 23 एप्रिल 2017

सन १९८५ मध्ये स्वतंत्र अस्तित्व मिळालेल्या जलस्रोत मंत्रालयाचा इतिहास ईस्ट इंडिया कंपनी सरकारनं १८५५ मध्ये स्थापन केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागापासून सुरू होतो. पुढं या विभागात पाटबंधारे विभाग समाविष्ट झाला. १९१९ मध्ये हे विषयक्षेत्र प्रांतीय सरकारांकडं देण्यात आलं. अल्पावधीत हा विभाग उद्योग व कामगार विभागाकडं नेण्यात आला. पुढं तीन दशकांनी पाटबंधारे विभागाला कृषी मंत्रालयाचा उपविभाग करण्यात आलं. अखेर १९८५ मध्ये या विषयक्षेत्राची फेररचना होऊन पाटबंधारे मंत्रालय उदयाला आलं आणि अलीकडं २०१४ मध्ये या मंत्रालयाचा विस्तार होऊन जलस्रोत मंत्रालय असं नामकरण झालं.

देशभर पाण्याचं जतन करणं, पाण्याचं समान वितरण करणं आणि वाया जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण कमी करणं या मुख्य उद्देशांबरोबरच कृषीविषयक जलसिंचन, अल्प व तातडीचं जलसिंचन, तसंच भूजलशोध इत्यादी कार्याबरोबरच राष्ट्रीय जलधोरण आखण्यासाठी हे मंत्रालय कार्यरत आहे.

उद्देशकार्यासाठी या मंत्रालयानं आयोग, मंडळं, समित्या, प्रकल्प, योजना आणि संशोधन संस्थाही स्थापन केलेल्या आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय जल आयोग, गंगा नदी पूरनियंत्रण आयोग, केंद्रीय भूजल मंडळाखेरीज विविध प्रमुख नद्या-खोऱ्यांसाठी मंडळ (उदाहरणार्थ : ब्रह्मपुत्रा, यमुना, तुंगभद्रा मंडळं), सरदार सरोवर बांधकाम सल्लागार समिती, तसंच भारतीय नदीजोड प्रकल्प माहीत असावेत. प्रकल्पयोजनांच्या अंतर्गत जलक्षेत्रे पुनर्साठवण पुनर्निर्माण व जतन, राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन, जलशास्त्र, दूरस्थ संवेदन माध्यमातून जलसाठ्यांचं अवलोकन इत्यादी १५ प्रकल्प कार्यरत आहेत.
जलस्रोत मंत्रालयाचं राष्ट्रीय बांधकाम प्रकल्प महामंडळ, भारतीय जल आणि शक्ती सल्लागार सेवा या सार्वजनिक क्षेत्रांतल्या संस्थाही आहेत. ‘प्रत्येक शेताला पाणी’ हे ध्येय समोर ठेवून आखलेली प्रधानमंत्री कृषी जलसंचयी योजना आणि सर्वसामान्यापर्यंत पाण्याचं महत्त्व समजण्यासाठी जलक्रांती अभियान या जलस्रोत्र मंत्रालयाची वेगळी कार्यं आहेत.

संशोधनासंदर्भात केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन संस्था, राष्ट्रीय जलविज्ञान संस्था आणि केंद्रीय माती आणि पदार्थ संशोधन संस्था कार्य करतात. जलक्षेत्रात विकसनशील देशांबरोबरही करार केलेल्या या मंत्रालयाचे विविध विभाग-उपविभाग-योजना-प्रकल्पांमध्ये आणि संशोधन संस्थांमध्ये कार्यक्षेत्राच्या विविध संधी उपलब्ध असतात. मात्र, त्यासाठी या सगळ्याची माहिती घेणं आवश्‍यक आहे.

संस्थेचा पत्ता :
जलस्रोत मंत्रालय, ६२६, श्रमशक्ती भवन,
रफी मार्ग, दिल्ली : ११० ००१. दूरध्वनी : (०११) २३७१४२००. संकेतस्थळ : www.wrmin.nic.in

Web Title: science professions