Seema Kohali: सीमा कोहली; स्थलांतर, स्मृती आणि आध्यात्मिकतेतून घडलेले सीमाचे कलाविश्व

Indian Painting: स्थलांतराच्या जखमा, स्मृती आणि तत्त्वज्ञानातून उमललेले सीमा कोहली यांचे आध्यात्मिक, बहुमाध्यमी कलाजगत
Seema kohali

Seema kohali

Esakal

Updated on

हर्ष भटकळ. - saptrang@esakal.com

सीमा कोहली यांना आई-वडिलांनी कलेसाठी प्रोत्साहन दिले. पेंटिंग्ज म्हणजे कलाकृतींकडे त्या निर्जीव वस्तू म्हणून पाहतच नाहीत. कलाकृती पाहणाऱ्यांचीच बनते, असे त्या म्हणतात. तत्त्वज्ञानाच्या व्यासंगामुळे त्या एक महत्त्वाच्या बाबतींत पारंगत होत्या. ते म्हणजे प्रश्न उभे करणे. उदाहरणार्थ, मिथकासंबंधीचे प्रश्न; जाणीव, चेतना, अस्तित्व म्हणजे काय? निरनिराळ्या माध्यमांशी परिचय नंतरच. आपल्या कलाकृतीमध्ये आध्यात्मिकता असल्याचे त्यांना मान्य आहे.

सीमा कोहली आपल्या पेंटिंग्जकडे निर्जीव वस्तू म्हणून पाहत नाहीत तर त्यांचे जिवंत अस्तित्व गृहीत धरतात. पेंटिंग असो, शिल्प किंवा प्रत्यक्ष कृती असो, त्या कलाकृती त्यातील गोष्टी, आठवणी यांच्यासह कॅनवासच्या पलीकडे हिंडत असतात. शिवाय साऱ्या जगाला कवेत घेणारा असा सूक्ष्म अदृश्य धागा असतोच. ‘‘माझ्या जागेत कोणी आलं की मी डोळे मिटून घेते आणि मला कोणी पाहिलं नाही असं मानते,” त्या गमतीत म्हणाल्या. लहानपणी त्या लाजाळू आणि अंतर्मुख वृत्तीच्या होत्या. त्यांच्या वडिलांच्या लक्षात आले, की ही मुलगी शब्दांतून सहजपणे व्यक्त होत नाही. त्यांनी तिच्यासमोर कागद आणि रंग ठेवले. ‘‘त्यांचा परिणाम जादुई होता. मला जे सांगायचं होतं ते मी चित्रातून दाखवू शकले.’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com