
-शाहीन इंदूलकर
मावशीच्या रोजच्या एक तासाच्या सहवासाची, तिच्या आयुष्यातल्या कटकटी ऐकण्याची मला सवय झाली होती. त्या दिवशी मात्र वाट्याला आलेलं सगळ्यात मोठं दुःख तिने ओकून टाकलं! माझ्या विचारांना तिनं चहूबाजूंनी धावायला लावलं. नात्यांचे गुंते माणसं आपल्या परीनी कशी सोडवतात, याचा एक धडा तिनं मला दिला.