
केदार फाळके - editor@esakal.com
शाहजी राजांनी नेहमीच संयमाने परिस्थिती हाताळली. शाहजी राजांच्या पराक्रमाच्या बळावर निजामशाहीस मुघल आणि आदिलशाही सैन्यावर देदीप्यमान विजय मिळाला. जगातील सर्वांत बलाढ्य शक्तिविरुद्ध बंड करण्याचे त्यांनी दाखविलेले धैर्य विलक्षण आहे. मुघल साम्राज्याविरुद्ध बंड करणाऱ्यांचे हाल काय होतात, हे जगजाहीर असतानाही त्यांनी बंड केले आणि तसे आपले हाल होऊ दिले नाहीत. येथे त्यांच्यातील धैर्य हा गुण प्रकर्षाने दिसून येतो.