

Maharashtra History Books
esakal
वर्षा वेलणकर - saptarang@esakal.com
भारताच्या इतिहासाचा आढावा घ्यायचे ठरवले, तर वैविध्यपूर्ण प्रदेशांनी या देशाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी काय काय योगदान दिले आहे, याचा मोठा लेखाजोखा मांडावा लागतो. त्यात महाराष्ट्राचे नाव कायमच वरच्या स्थानावर राहिले आहे. मात्र, या कणखर, राकट आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्याच्या जडणघडणीत ज्यांचा सहभाग होता त्या धुरिणांची माहिती, त्यांचे कार्य हेही राज्याच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या दृष्टीने आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश ही मालिका महत्त्वाची ठरते. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘साप्ताहिक विवेक’ने आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्यक्तिमत्त्वांची संपूर्ण माहिती देणाऱ्या चरित्रकोशांची मालिका प्रकाशित करण्याचा संकल्प केला. या मालिकेतील समाजकारण-राजकारण-पत्रकारिता आणि उद्योग-अर्थकारण-क्रीडा हे दोन खंड नुकतेच प्रकाशित झाले आहेत.