पश्चिम आशियात इस्राईलच्या गाझा पट्टीतल्या आणि लेबनॉनमधल्या लष्करी कारवाईनंतर हा भाग अस्थिरतेच्या गर्तेत असताना, सीरियात तिथल्या इस्लामी बंडखोरांनी बशर अल् असद यांची राजवट उखडून टाकण्यात यश मिळवलं. गेली ५० वर्षं सीरियात सत्तेत असलेल्या असद-कुटुंबाला पलायन करावं लागलं. बशर अल् असद यांच्या सत्तेचा घास घेण्यासाठी अमेरिका, इस्राईलसह पाश्चात्त्य देशांनी, तसंच अरब देशांनी प्रयत्न करूनही त्यात त्यांना यश येत नव्हतं. ते बंडखोरांनी पंधरा दिवसांत साध्य केलं हा जगाला धक्का आहे.
पश्चिम आशियातल्या इतिहासातलं एक वळण या घटनेनं आणलं आहे.