

Shri Samarth Spiritual Karmayog book
sakal
आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामारिकशास्त्र
आंतरराष्ट्रीय संबंध, सामारिकशास्त्र, सुरक्षा... याबद्दलचं कुतूहल अनेक जणांना असलं, तरी त्यातील संकल्पना सामान्य वाचकाला पटकन कळत नाही. त्यामुळे गोंधळ उडू शकतो. त्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी ‘इंटरनॅशनल रिलेशन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ या श्रीकांत परांजपे लिखित पुस्तकाचा व्ही. वाय. जाधव यांनी ‘आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामारिकशास्त्र’ या शीर्षकाखाली केलेला अनुवाद महत्त्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा अभ्यास, युद्ध आणि शांतता, १९४५ नंतरची जागतिक अवस्था, प्रादेशिकवाद आणि अलिप्ततावाद, सामरिकनीती-अणुयुग, समकालीन सामरिक समस्या अशा आठ प्रकरणांमध्ये या विषयाचा परीघ उलगडण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल.
वैशिष्ट्य : विविध प्रवाह, घटना आणि संकल्पनांची मुद्देसुद कालसुसंगत मांडणी व उपयुक्त संदर्भसूची. प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स, पुणे पृष्ठे : ३०८ मूल्य : ७५० रु.