इंडस्ट्रिअल डिझाइन (श्रीरंग गोखले)

श्रीरंग गोखले skg2743@gmail.com
रविवार, 16 एप्रिल 2017

इंडस्ट्रिअल डिझाइन हा कला- तंत्रज्ञान- संस्कृती यांचा मिलाफ आहे, असं म्हटलं तरी त्यात एका शास्त्राचाही समावेश आहे. ते म्हणजे Ergonomics. म्हणजे कार्याभ्यास किंवा वर्तनक्षमता, असं ढोबळमानानं म्हणता येईल. वस्तू वापरताना ग्राहकाला कमीत कमी कष्ट पडावेत, याविषयीचा अभ्यास यात असतो.

निर्मितीच्या प्रक्रियेत वस्तूला आकर्षक रूप देणाऱ्या इंडस्ट्रिअल डिझायनरची कामगिरी फार महत्त्वाची असते; त्याबरोबरच ग्राहकाचा साकल्यानं विचार करून त्याला वापरासाठी सुविधा देणं हेही आलंच.

इंडस्ट्रिअल डिझाइन हा कला- तंत्रज्ञान- संस्कृती यांचा मिलाफ आहे, असं म्हटलं तरी त्यात एका शास्त्राचाही समावेश आहे. ते म्हणजे Ergonomics. म्हणजे कार्याभ्यास किंवा वर्तनक्षमता, असं ढोबळमानानं म्हणता येईल. वस्तू वापरताना ग्राहकाला कमीत कमी कष्ट पडावेत, याविषयीचा अभ्यास यात असतो.

निर्मितीच्या प्रक्रियेत वस्तूला आकर्षक रूप देणाऱ्या इंडस्ट्रिअल डिझायनरची कामगिरी फार महत्त्वाची असते; त्याबरोबरच ग्राहकाचा साकल्यानं विचार करून त्याला वापरासाठी सुविधा देणं हेही आलंच.

वस्तुनिर्मितीच्या प्रक्रियेत अगदी सुरवातीचं स्थान हे इंडस्ट्रिअल डिझाइनचं असतं. वस्तूचं आकर्षक बाह्य रूप ठरवणं व तिच्या वापरासाठी ग्राहकाला सुलभता प्रदान करणं हे यांचं मुख्य काम. चित्रकार आणि इंजिनिअर यांचा यात सुंदर मिलाफ असतो. आमची उत्पादनं करमणूकप्रधान असल्यानं ती अद्ययावत दिसणाऱ्या, सुबक व नवीन फॅशनप्रमाणे असणं हे गरजेचं असे.

आमची कंपनी आंतरराष्ट्रीय असल्यानं सर्व उत्पादनं बाहेरून येत असतील, असा लोकांचा समज होता; पण परिस्थिती बरोबर उलट होती. जगभरातल्या उत्पादनांचा संदर्भ असे; पण ग्राहक इथलाच असल्यानं डिझाइन त्याच्यासाठी इथंच बनत असे. इंडस्ट्रिअल डिझाइनचा ब्रॅंडशी जवळचा संबंध असतो. लोगो, चिन्ह, अक्षरं, जाहिराती, वेबपेज या सगळ्यामधून कंपनीची जी प्रतिमा निर्माण होते, ती या घटकांद्वारेच.
इंजिनिअर झाल्यावर मुंबईच्या आयआयटीमधून एका स्पेशल अभ्यासक्रमाद्वारे किंवा शास्त्रशाखेतून पुढं शिकून इंडस्ट्रिअल डिझायनर होता येतं. पुण्यातही काही कॉलेजं आहेत. यातली सर्वोत्तम संस्था म्हणजे भारतात व जगातही प्रसिद्ध असलेली अहमदाबादची National Institute of Design (NID). सगळ्या व्यवसायांकडून इंडस्ट्रिअल डिझाइनला खूप मागणी असते. वाहनं, पादत्राणं, गृहोपयोगी वस्तू, प्रवासी साहित्य, फर्निचर अशा सगळ्या ठिकाणी यांचं योगदान असतं. नुसतं आकर्षक रूप देणं हे एवढंच इंडस्ट्रिअल डिझाइनचं काम नसतं, तर वापरणाऱ्याला ते वापरायला सोपं जाईल (User-friendly) अशी त्यानं रचना करणंही अभिप्रेत असतं. इतकंच नव्हे, तर वापरणाऱ्यांची संस्कृती, कल, स्वभाव यांचंही भान ठेवावं लागतं. काही वेळा रंग, एखादं घोषवाक्‍य, संचाचं नाव इत्यादीबाबत निर्णय घेताना हॉलंडकडून विचारणा होई ः ‘भारतीय संदर्भात हे योग्य आहे का?’
प्रिंटेड बोर्ड, स्पीकर, नॉब, कॅसेट डेक असल्या रुक्ष गोष्टींमधून जेव्हा एखादं देखणं उत्पादन तयार होतं, तेव्हा आश्‍चर्य वाटे. हाच सेट दोन वर्षांनी जुना वाटायला लागला, की ‘रूपपालट’च्या (facelift) नावाखाली त्यालाच नवा साज चढवला जाई. अत्यंत प्रेरक कल्पनाशक्ती याच्यामागं असे.

कुठल्याही कल्पकतेला अभ्यासाचा पाया लागतोच. आमचे परदेशातून येणारे संच, प्रतिस्पर्ध्यांची उत्पादनं, त्याकाळी प्रचलित असलेले रंग, नवनवे प्रयोग, इतर गृहोपयोगी वस्तूंचा कल, कपडे व इतर फॅशन, माध्यमं या सगळ्यांचं भान डिझाइन करताना ठेवावं लागतं. ‘कन्सेप्ट ब्रीफ’ किंवा ‘लिखित मसुदा’ ही उत्पादन कसं हवं, याची सुरवात असते. यावर आम्ही काही कच्चे आराखडे बनवून इंडस्ट्रिअल डिझाइनरला देत असू. त्यावर काम करून इंडस्ट्रिअल डिझायनर वस्तूचं बाह्य रूप कसं असेल, याची कल्पना देणारी चार-पाच वेगवेगळी रेखाटनं दोन-तीन आठवड्यांत तयार करत असे. यांना ‘रेडरिंग्ज’ असं म्हटलं जातं. नंतर संगणकाचं युग आलं; पण हातानं काढलेल्या चित्रांची मजा काही औरच असे. संचाचा अनोखा आकार, ग्राफिक्‍स, रंग यांचं हे यथार्थ चित्र असे. प्रॉडक्‍ट डिझायनर, मार्केटिंग, फॅक्‍टरी मॅनेजमेंट व इंडस्ट्रिअल डिझायनर अशा सगळ्यांसाठी एक सादरीकरण होई. त्यात चर्चा होऊन त्यातल्या एका रेखाटनावर शिक्कामोर्तब केलं जाई. आहे तसं रेखाटन क्वचितच फायनल होई. कारण, त्यात छोटे बदल सुचवले जात किंवा ‘यातलं हे’, ‘त्यातलं ते’ यातून नव्याच कल्पनेचा जन्म होई. अशा बैठकी महत्त्वाच्या असत. कारण, माझ्या ज्ञानाचा यात कस लागत असे. ‘या याप्रमाणे संच होऊ शकेल,’ हा निर्णय अर्ध्या-पाऊण तासात सांगावा लागे. अर्थात, काही वेळा गमतीही घडत. चित्र पाहून वस्तूची कल्पना करण्याची सवय नसलेले एक जण ‘बॅंड स्विच कुठं आहे?’ या प्रश्‍नाच्या उत्तरादाखल ‘संचाच्या मागं’ असं म्हटल्यावर कागद उलटून पाहू लागले! डायलचा पारदर्शकपणा दाखवण्यासाठी त्यावर कवडसा पडलेला दाखवण्यात आला होता; पण एकाला त्याचं आकलनच झालं नव्हतं!

यानंतर या स्केचप्रमाणे अगदी खऱ्यासारखी दिसणारी प्रतिकृती बनवली जाई.
इथं मला इंडस्ट्रिअल डिझायनरची तुलना संगीतकाराशी करावीशी वाटते. दिलेल्या शब्दांना चाल लावणं हे संगीतकाराचं काम असतं. इंडस्ट्रिअल डिझायनरही तसंच करत असतो. दिलेल्या आराखड्यात फारसे बदल न करता बहुतेक वेळा तो सुंदर बाह्य रूप आकाराला आणतो; पण काही अपवादात्मक वेळी बदलत्या व प्रचलित फॅशनप्रमाणे डिझाइन करणं अपरिहार्य असतं, त्या वेळी आराखडा जरा बाजूला ठेवावा लागतो. रेकॉर्डरला वरच्या बाजूला ट्यूनिंग नॉब देणं, ट्यूनर ॲम्प्लिफायरला ॲल्युमिनियमचं तावदान लावणं हे अवघड असलं तरी करावं लागलं. कल आणि लोकप्रियता पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आमचं उत्पादन तयार करताना कधी इन्स्ट्रुमेंटल लूक, कधी रग्बी बॉलसारखा सॉफ्ट लूक, कधी कॉकपिटसारखं डिझाइन असं करत राहावं लागलं. असल्या सर्व वैशिष्ट्यांना उत्पादनात उठाव देणं हा इंडस्ट्रिअल डिझाइनचा आवडता खेळ असतो. एकदा असंच डिझाइनच्या वेळी एका छोट्या रेडिओचं हॅंडल पुढं आणलं होतं व ते छान दिसत होतं.

माझ्या करिअरच्या सुरवातीला एम. एम. सिंग हे डिझायनर होते. जरा गंभीर प्रकृतीचे आणि कामात एकदम दक्ष. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. त्यानंतर अशोक पानवलकर यानं ती जागा घेतली आणि त्याच्याबरोबरही मी पुष्कळ उत्पादनं निर्मिली. कल्पकता आणि सृजनशीलता हे शब्द मी जेव्हा वाचतो, तेव्हा अशोकचीच मूर्ती माझ्या डोळ्यांपुढं येते. डिझायनरला आवश्‍यक असणारे सगळे गुण अशोकमध्ये आहेत. चित्रकलेतलं कौशल्य तर होतंच; अभियांत्रिकीचं ज्ञान, ग्राहकाची मानसिकता ओळखण्याची कला, खिलाडू वृत्ती, कष्टाची तयारी, विनोदबुद्धी हेही होतं. कामात काहीसा विसावा म्हणून मी त्याच्या खात्यात अनेकदा एखादी चक्कर मारून येत असे व ताजातवाना होऊन येई. त्याच्याकडं वातावरण नेहमीच उत्साही असे. नवी स्केचेस, मॉडेल, माहितीची कात्रणं, सॉफ्टबोर्डवर टाकलेली चित्रं, कार्टून असं काहीबाही पाहायला मिळे. त्याचा कर्मचारीवर्गही नावीन्यांचा सतत शोध घेणारा होता. त्याच्याकडं दोन-दोन वर्षांसाठी डच डिझायनर लिन पेपल व जेरी ऑईस येऊन गेले. त्यांनी अनोखी डिझाइन बनवली होती. भारत देश दोघांचाही खूप आवडता. संचाचं डिझाइन करता करता अशोकचं खातं/विभाग खूप वाढला. लाइट फिटिंग्ज, मिक्‍सर ग्राइंडर, जाहिराती, प्रदर्शनं, दुकानं, इंटरॲक्‍टिव्ह डिझाइन हे सगळं वाढत गेलं. निवृत्तीनंतर त्यानं  ३F (Fun, Form and Function) नावाचं दुकान काढलं आहे. आजही तो पुण्यातल्या डिझाइन इन्स्टिट्यूटमध्ये सल्लागार म्हणून जातो. डिझाइन या विषयावर अनेक विद्यार्थी त्याचं मार्गदर्शन घेतात. मी काम करत होतो, त्या कंपनीत डिझाइन सेंटरची धुरा आता अभिमन्यू कुलकर्णी याच्याकडं आहे. हॉलंडच्या डिझाइन डिपार्टमेंटचीही भारतीय शाखा तो सांभाळतो.

निर्मितीचं एक उदाहरण आठवतं. शहरी ग्राहक व ग्रामीण ग्राहक यांचा वस्तूकडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असे. शहरी ग्राहकाला छोटासा, नेटका रेडिओ संच आवडे, तर ग्रामीण लोक मोठा, बळकट दिसणारा संच पसंत करत. एका स्टीरिओ रेकॉर्डरला एकाच बॅक कॅबिनेटला दोन वेगवेगळे फ्रंट पॅनेल लावायचं डिझाइन करण्यात आलं होतं. एका पॅनेलनं संच एकदम लहान, लांबुळका दिसे, तर दुसऱ्या पॅनेलनं त्याच बॅकचा संच मोठा, उंच भासे. त्या वेळी हे ४८१/४८२ संच खूप लोकप्रिय झाले होते.
डिझाइनमध्ये काय गमक होतं ठाऊक नाही; पण आमचा संच हातात घेतला, की ‘हा फिलिप्सचाच आहे’ हे कळे. डिझाइन म्हणजे भपका, चमचमणारे भाग, रंगांची उधळण असं नसतं; तर आकार, ग्राफिक्‍स, रंग आणि पोत यांचा एक भारदस्त परिणाम असतो.

या निर्मितिप्रक्रियेत ग्राहकाची मानसिकता टिपण्याची काही तंत्रं होती. फॅशनचा कल आणि ग्राहकाची आवड यांचं एक मॅट्रिक्‍स अशोक बनवत असे. त्यात आपलं व प्रतिस्पर्धी उत्पादन यांचे परस्परसंबंध कळत. चाकोरीबाहेरचा विचार करण्यासाठी वर्षात एकदा ‘क्रिएटिव्हिटी वर्कशॉप’ घेतलं जाई. त्यातून एकदा ‘पेपर रेडिओ’ या कल्पनेचा जन्म झाला. सहज बदलत्या येणाऱ्या कॅबिनेटसाठी कागद वापरून व्यक्तिसापेक्ष छोटेखानी रेडिओ बनविण्याची ही कल्पना. मातीच्या घटातला संचही बनवण्यात आला होता.  ‘दणकट’ व ‘टिकाऊ’ संच बनवणारे अशी आमची प्रतिमा बराच काळ झाल्यानं चिकित्सक, प्रौढ लोक आमचे ग्राहक होते; पण तरुणवर्गाला हवं तसं ‘हट के’ उत्पादन आमच्याकडं नव्हतं. मग त्या वेळी छोटे रेडिओ, वॉकमन यांना वेगवेगळं रंगरूप देऊन त्यांच्यासाठी Moving Sound ही रेंज आम्ही तयार केली व तिचा चांगला खप झाला होता.

इंडस्ट्रिअल डिझाइन हा कला- तंत्रज्ञान- संस्कृती यांचा मिलाफ आहे, असं म्हटलं तरी त्यात एका शास्त्राचाही समावेश आहे. ते म्हणजे Ergonomics. म्हणजे कार्याभ्यास किंवा वर्तनक्षमता, असं ढोबळमानानं म्हणता येईल. वस्तू वापरताना ग्राहकाला कमीत कमी कष्ट पडावेत, याविषयीचा अभ्यास यात असतो. उदाहरणार्थ ः सेट उचलताना सुलभ जावं म्हणून सेटचा वरचा भाग व हॅंडल यांत किती अंतर असावं? आवाज स्पष्ट येण्यासाठी स्पीकरपुढचं ग्रिल किती टक्के उघडं पाहिजे? किंवा अगदी वेगळं उदाहरण म्हणजे, आरामशीर बसण्यासाठी खुर्चीच्या सीटची उंची जमिनीपासून किती पाहिजे इत्यादी. हा वर्तनक्षमतेचा अभ्यास इंडस्ट्रिअल डिझायनरला अनिवार्य असतो. आमच्या कंपनीचंसुद्धा ग्राहकाचा अभ्यास करून तयार केलेलं स्वतःचं असं एक संदर्भपुस्तक होतं. याचाच एक भाग म्हणजे यूजर इंटरफेस. ग्राहकाशी सहज संवाद साधेल, अशा सुलभतेची खात्री.

इंडस्ट्रिअल डिझाइनचं महत्त्व जाणून आपल्या उत्पादनाला जादूचा स्पर्श करणारी ही युक्ती सगळ्यांनी वापरावी असं सुचवावंसं वाटतं.
छोटेखानी मशिन बनवणाऱ्या माझ्या एका उद्योजक मित्रानं इंडस्ट्रिअल डिझायनरकडून सल्ला घेऊन मशिनला वेगळा रंग दिला, काही लेबलं लावली, एक-दोन पार्टचं प्लेटिंग केलं व प्रदर्शनात एक्‍स्पोर्ट ऑर्डर मिळवल्या! काही झालं तरी Design is being good, just not looking good!

Web Title: shrirang gokhale's article in saptarang