Philosophy of Life and Death : व्यक्ती काय असते?

Shyam Manohar Saptarang Articles : मृत्यूच्या भयावर मात करण्यासाठी 'वेडेपण' हा एक जाणीवपूर्वक केलेला उपाय ठरू शकतो का? श्‍याम मनोहर यांनी शरीर, मन आणि बुद्धीच्या संघर्षातून मानवी अस्तित्वाचा आणि शहाणपणाचा एक वेगळाच अन्वयार्थ या लेखात मांडला आहे.
Philosophy of Life and Death

Philosophy of Life and Death

esakal

Updated on

श्‍याम मनोहर - saptrang@esakal.com

शरीर, मन, बुद्धी.

शरीराने व्यक्ती एकटी असते. मनाने अस्वस्थ असते. बुद्धी प्रश्न निर्माण करते. शरीराचे, मनाचे, बुद्धीचे काय करायचे, हा प्रश्न व्यक्तीला गुप्तपणे सतावत असतो.

शरीर आपोआप थकते. मन चिडचिडे होते.

प्रश्नांची अपुरी उत्तरे मिळतात. नाइलाजाने व्यक्ती मृत्यू पावते.

प्रश्न

व्यक्तीची सुरक्षा : निसर्ग हमी देतोय?

व्यक्ती निसर्गाच्या सुरक्षेची हमी देतेय?

शासन, प्रशासन व्यक्तीला शंभर टक्के सुरक्षा देतेय? किती टक्के सुरक्षा देतेय? किती टक्के सुरक्षा देऊ शकते?

शासन, प्रशासन व्यक्तीला शंभर टक्के सुरक्षा देऊ शकत नाही, हे शासनाला, प्रशासनाला उमजते?

व्यक्तीने शासनाला, प्रशासनाला सुरक्षा द्यायची असते, हे व्यक्तीला उमजतेय?

समाज व्यक्तीला किती सुरक्षा देतोय? व्यक्ती समाजाला किती सुरक्षा देतेय?

व्यक्ती व्यक्तीला किती सुरक्षा देतेय? व्यक्ती स्वतःला किती सुरक्षित ठेवू शकते?

सर्वसाधारण व्यक्ती आणि खास व्यक्ती - यांच्या सुरक्षेत फरक का आहे?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com