
दिलीप कुंभोजकर kumbhojkar.dilip@gmail.com
‘आई’ म्हणोनि कोणी आईस हाक मारी
ती हाक येइ कानी, मज होय शोककारी
आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘श्यामची आई’ (मूळ आत्मकथनपर लेखन : सानेगुरुजी) या चित्रपटात या सुंदर कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे. मराठीतील हा पहिला सुवर्णपदकविजेता चित्रपट.
आशा भोसले यांचा आर्त स्वर आणि वसंत देसाई यांचे हृदयस्पर्शी संगीत या दोन्ही बाबी कवितेची महती वाढवतात.