नववर्षाच्या सुरुवातीला या सदराच्या पहिल्याच लेखात आपण २०२५ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयमुळे कोणकोणते आविष्कार पाहायला मिळतील, याबाबत भाष्य केले होते. आता एआयच्याही पुढे जाऊन ‘एजीआय’ म्हणजेच ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’चे युग सुरू होईल. विशेष म्हणजे हा ‘एजीआय’ मानवी बौद्धिक कौशल्याची बरोबरी करेल आणि त्यानुसार जी कामे आपण स्वतः करतो, किंवा त्याला सांगू, ती बऱ्यापैकी ‘एजीआय’ स्वतःहून करेल, याबाबत आपण त्या लेखात सविस्तर चर्चा केली होती.