
प्रा. मिलिंद जोशी - editor@esakal.com
मराठी वाचकांना सु. ल. खुटवड हे नाव विनोदी साहित्याबरोबरच ‘सकाळ’ मधील विविध विनोदी स्तंभलेखनामुळे चांगलेच परिचित आहे. त्यांनी ‘पंच’नामा नावाचे सदर सलग तीन वर्षे दररोज लिहिले. वाचकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक लेखांचे पुनर्लेखन केलेले विस्तारित लिखाण म्हणजे नस्ती ‘पंचा’ईत, जनूभाऊ, कागदी घोडे, हास्याची लाट आणि विनोदाचं गुऱ्हाळ ही पाच पुस्तके होय. ‘पंच’नामाच्या या पाच पुस्तकांतून त्यांनी विनोदाचा पंचरंगी वाचनीय खजिना वाचकांसमोर खुला केला आहे. प्रसंगनिष्ठ विनोद, खटकेबाज संवाद, नाट्यपूर्ण घडामोडी, ओघवती आणि चुरचुरीत शैली ही या पाचही पुस्तकांची वैशिष्ट्ये आहेत. त्याचबरोबर उपहास आणि उपरोधाची मुक्तहस्ते उधळण यामधून जाणवते.