व्यायामाला रोजच प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 July 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

स्लिम फीट - सारा अली खान, अभिनेत्री
फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी मला हार्मोनल डिसऑर्डरचा त्रास होता. यामुळे वजन प्रचंड प्रमाणात वाढते. मला आधीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. त्यासाठी माझे शरीर फिट असणे गरजेचे होते. मी प्रत्यक्षात चित्रपटात काम करण्याआधी माझे वजन ९६ किलो होते. त्यानंतर तब्बल ३० किलो वजन कमी करणे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते, पण ते कमी केल्याचा मला आनंद आहे.

मी शिक्षणानिमित्त बाहेर होते, तेव्हा घराजवळच असलेल्या शॉपमधून मी भरपूर पिझ्झा आणून खायचे. माझ्या लक्षातही आले नाही की, त्याच्या शेजारी व्हिटॅमिन शॉप आहे, जिथे सर्व पौष्टिक पदार्थ मिळतात. मला माझ्या वजनाची जाणीव झाली, त्या वेळी ते शॉप माझ्या लक्षात आले. तिथून पुढे मी खूप मेहनत घेत ३० किलो वजन कमी केले. आता मी माझ्या खाण्याच्या सर्व सवयी बदलल्या आहेत. 

सकाळच्या नाश्‍त्यात मी अंड्याचा पांढरा भाग व टोस्ट  किंवा इडली खाते. दुपारच्या जेवणात चपाती, डाळ, भाजी, सलाड आणि फळे घेते. त्यानंतरच्या नाश्‍त्यामध्ये विविध भाज्या घातलेला उपमा खाते. रात्रीच्या जेवणात चपाती आणि भाजी असा हलका आहार घेते. वर्कआउटच्या आधी फळांसोबत ओट्स घेते आणि वर्कआउट झाल्यानंतर प्रोटीन शेक, टोफू आणि सलाड घेते. 

वर्कआउटच्या बाबतीत सांगायचे झाले तर, मी रोजच व्यायाम करते. व्यायामचा कंटाळा येऊ नये यासाठी मी रोज वेगवेगळ्या प्रकाराचे व्यायाम करत असते. ट्रेडमीलवर शक्य तेवढ्या जास्त स्पीडने पळण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याचप्रकारे कार्डिओ एक्सरसाईजही असते. सध्या माझे आहे, तेच वजन कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slim Fit Sara Ali Khan maitrin supplement sakal pune today