प्रवासाच्या काळातही हेल्दी फूड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

"स्लिम फिट" - सोनम कपूर, अभिनेत्री
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत...

"स्लिम फिट" - सोनम कपूर, अभिनेत्री
शिक्षण घेत असताना माझे वजन खूप वाढले होते आणि माझे त्याकडे फारसे लक्षही नव्हते; परंतु मला माझा पहिला चित्रपट ‘सांवरिया’ची ऑफर आल्यानंतर मी वजन कमी करण्याचे मनावर घेतले. सुरवातीला माझ्यासाठी ही कठीण गोष्ट होती; पण डाएट आणि वर्कआउटच्या मदतीने मी तब्बल ३५ किलो वजन कमी केले! आजही मी तोच डाएट प्लॅन फॉलो करते. 

मी रोज अर्धा तास कार्डिओ पद्धतीचे व्यायामप्रकार करते. आठवड्यातून दोन दिवस नृत्याचे प्रशिक्षण घेते. इतरवेळी मी पॉवर योगाचा सराव करते. मी मोकळ्या वेळात स्वीमिंग करणे पसंत करते. त्याचबरोबर मी स्क्वॅशही खेळते. फुडी असल्याने डाएट खूप पाळत नाही. मी सर्व काही खाते, अगदी चॉकलेटसुद्धा; पण कोणते पदार्थ किती खायचे, याचे प्रमाण ठरवलेले असते. त्वचा आणि शरीर चांगले राहावे यासाठी खूप पाणीही पिते. 

मी दिवसातून पाच वेळा खाते. सकाळच्या नाश्‍त्याला ओटमील आणि फळांनी भरलेली डिश असा भरगच्च आहार घेते. दुपारच्या नाश्‍त्याला अंड्यासोबत ब्राऊन ब्रेड किंवा फळांच्या ज्यूससोबत प्रोटिन शेक घेते. दुपारच्या जेवणात डाळ, भाजी, एक चपाती, सलाड व सोबत एखादा चिकनचा अथवा माश्‍याचा तुकडा खाते. संध्याकाळी जास्त फायबर असलेले चिकन किंवा अंड्याचा पांढरा भाग खाते. रात्रीच्या जेवणात सूप, सलाड व एखादा चिकन किंवा माश्‍याचा तुकडा एवढा आहार घेते. शूटिंगचे बीझी शेड्यूल असल्याने मला भरपूर प्रवासही करावा लागतो. त्यादरम्यान रोजचे डाएट व व्यायाम करणे जमतेच असे नाही. त्यामुळे प्रवासादरम्यान डाएट पाळणे शक्‍य नसल्यास मी एखादे सफरचंद, सॅंडवीच असे हेल्दी काहीतरी सोबत ठेवते. प्रवासात हलका आहार घेतल्याने मला फार कॅलरी जाळण्याची गरज पडत नाही आणि वजनवाढीच्या समस्येपासून दूरही राहता येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slim Fit Talk Sonam Kapoor Maitrin Supplement Sakal Pune Today