

Smart City
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर
जगभरात काही स्मार्ट सिटीमध्ये डस्टबिन्स, ट्रॅफिक सिग्नल्स, वाहनं आणि अशा अनेक गोष्टींपासून कोट्यवधी सेन्सर्समार्फत प्रचंड मोठा डेटा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कम्प्युटर्सकडे इंटरनेटद्वारे येतो. तिथे त्याच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अलगॉरिदम्स वापरून निष्कर्ष काढले जातात. त्यांच्यातले पॅटर्न्स शोधले जातात आणि त्यानंतर रोबोट्स, ड्रोन्स किंवा कर्मचारी यांच्या साहाय्यानं कृती केली जाते.