सोशल मीडियावरचं गाजलेलं...‘ब्लॅक’ फ्रायडे

सूरज उदगीरकर (८६००९५२४७८) suraj.n.udgirkar@gmail.com
रविवार, 23 जुलै 2017

‘‘हाजी मस्तान?’’ 
: ‘‘झालाय सर!’’
‘‘दाऊद इब्राहिम?’’ 
: ‘‘लै वेळा झालाय सर..’’
‘‘मन्या सुर्वे?’’ 
: ‘‘झालाय तो पण सर...’’
‘‘मग तो डॅडी?’’ 
: ‘‘तोही झाला सर! तो तर मराठीतपण झालाय म्हणे.’’
‘‘मग तो कोण रे तो? माया डोळस?’’ 
: ‘‘झाला ना सर तोही...!’’
‘‘अरेरे. कमीत कमी एखादा शकील किंवा राजन बिजन तरी उरलाय का? छोटा मोठा कसलाही..?’’  
: ‘‘अहो सर, तसले फार झालेत!’’
‘‘अरे एखादं तरी उरलं असेल की बेणं! नाही तर एक काम कर...रॅंडम खुनी गुंड ग्लोरिफाय करून टाक. मस्त स्मगलिंग-दारू-खून-दरोडे वगैरे...आणि ऐक, एक आयटम सोंग पण टाक!’’

‘‘हाजी मस्तान?’’ 
: ‘‘झालाय सर!’’
‘‘दाऊद इब्राहिम?’’ 
: ‘‘लै वेळा झालाय सर..’’
‘‘मन्या सुर्वे?’’ 
: ‘‘झालाय तो पण सर...’’
‘‘मग तो डॅडी?’’ 
: ‘‘तोही झाला सर! तो तर मराठीतपण झालाय म्हणे.’’
‘‘मग तो कोण रे तो? माया डोळस?’’ 
: ‘‘झाला ना सर तोही...!’’
‘‘अरेरे. कमीत कमी एखादा शकील किंवा राजन बिजन तरी उरलाय का? छोटा मोठा कसलाही..?’’  
: ‘‘अहो सर, तसले फार झालेत!’’
‘‘अरे एखादं तरी उरलं असेल की बेणं! नाही तर एक काम कर...रॅंडम खुनी गुंड ग्लोरिफाय करून टाक. मस्त स्मगलिंग-दारू-खून-दरोडे वगैरे...आणि ऐक, एक आयटम सोंग पण टाक!’’
: ‘‘आयटम काय?’’
‘‘आयटम सोंग रे!’’
: ‘‘अहो सर, पण सत्या, वास्तव, कंपनी झालेत ना!’’
‘‘मग आता काय चांगला आशय घेऊन सिनेमा काढू? मी काय किसतो फार नायलॉन आहे?’’
: ‘‘ख्रिस्तोफर नोलन’’
‘‘तेच ते! जास्त शहाणपणा करू नको! खुनी डॉन शोध एखादा चल...’’
: ‘‘कुठून शोधू? पार गावखेड्यातल्या सुपारीचघळ्या दीडपसली गुंडापासून ते इंटरनॅशनल डॉनपर्यंत सगळे गुंडे शिळे झालेत!’’
‘‘मग आता रे?’’
: ‘‘सर आयडिया!! लेडी चालेल का? म्हणजे लेडी डॉन! फक्त फुलनदेवीवर झालाय सिनेमा...एकदम फ्रेश आहे विषय!’’
‘‘वाह वाह! पण लेडी डॉन आणायची कुठून?’’
: ‘‘दाऊदची बहीण आहे की! हसिना पारकर!’’
‘‘बेष्ट!! चल लाग कामाला...’’
: ‘‘दोन तासांत स्क्रिप्ट बनवतो.’’
‘‘दोन तास कशाला बे? दहा मिनिटं खूप झाली. एखादी किरकोळीतली अभिनेत्री घे लीडसाठी म्हणून! तोंडात गुटखा भर आणि डायलॉग बोल म्हणावं.’’
: ‘‘डन सर!’’
........
सगळी तयारी झालीय! येतोय सिनेमा.

Web Title: social media famous