

Social Satire Story
esakal
सारिका चाटुफळे-कुलकर्णी - saptrang@esakal.com
एका शहरात पन्नाशीच्या वयाची एक मुंगीकाकू राहत असे. मुंगीकाकूंचा नवरा मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर कामाला होता. काकूंना आपल्या सोसायटीत खूप सोशल वर्क करण्याची आवड होती. त्यामुळे तरुण मुले कुठे बसलेली असतील तर त्यांना हटकणे, शिस्त लावणे, कुत्री फिरवायला येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवणे, कोणाच्या घरी काय चालू आहे यावर बारकाईने लक्ष ठेवणे अशा सोशल वर्कशी निगडित गोष्टी मुंगीकाकू सतत करत असत. या सगळ्या कार्यातून त्यांना खरे तर स्वतःच्या घरच्या कामासाठी वेळच मिळत नसे. पण मुंगीने कार्यमग्न असणे हाच तिचा गुणधर्म नाही का?
रोजच मुंगीकाकू कितीतरी वेळ शेजाऱ्यापाजाऱ्यांशी गप्पा करण्यात घालवत असत. त्यातून सामाजिक सलोखा वाढतो असे त्यांचे म्हणणे होते. (खरे तर असे सगळ्यांशी गप्पा मारल्याने त्यांना सोसायटीत चाललेल्या सगळ्या गोष्टींची खबर मिळत असे.) तर अशा सामाजिक सलोख्यासाठी कितीही वेळ खर्ची पडला, तरीही मुंगीकाकूंना त्याची पर्वा नव्हतीच. (असेही या वेळेचे काय करायचे हा प्रश्न त्यांना होताच.