old man discussion
sakal
- सारिका चाटुफळे-कुलकर्णी, sarikachatuphale.kulkarni@gmail.com
सोसायटीच्या बागेत सगळे ज्येष्ठ नागरिक जमलेले होते. कुठल्या तरी विषयावर गरमागरम चर्चा रंगलेली होती. त्याच्या जोडीला खायला गरमा गरम भजी होती. भजी तर खमंग आणि कुरकुरीत होतीच परंतु त्याबरोबर जोशी काकांकडे खमंग बातमीदेखील होती. या बातमीचा स्क्रिनशॉट काढून काकांनी सगळ्या ग्रुपवर सकाळीच फॉरवर्ड केलेला होता.