हास्य : एक प्रार्थना

श्री श्री रविशंकर
गुरुवार, 16 मे 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "ऑल इज वेल" पुरवणीत...

चेतना तरंग
आपण आपला दिवस हास्य आणि प्रेमाने सुरू करता, तेव्हा आपले जीवन दैवी रूपाने उत्साहित होते. सकाळी बाहेरून आणि आतून खोलवरून हसणे हीच, खरी प्रार्थना आहे. हास्य आपल्या हृदयातून आणि आपल्या अस्तित्वाच्या मध्यभागातून येते. आपले पोट हास्याने इतके भरलेले आहे की, हास्य आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये प्रवेश करते. खरे हास्य ही खरी प्रार्थना आहे. सर्व काही ठीक होते तेव्हा प्रत्येकजण हसतो; परंतु सर्व काही बिघडते आणि तरीही आपण हसता, तेव्हा आपली उत्क्रांती होते. जीवनात हसण्यापेक्षा जास्त मौल्यवान काहीच नाही. ते कधीही गमावू नका. घटना येतात आणि जातात. काही आनंददायी आणि काही अप्रिय असतात.

तुमच्यामध्ये खोलवर एक क्षेत्र आहे, ज्याला आपण स्पर्श केलेला नाही. ते तुम्ही स्वतःमध्ये धरून ठेवा. त्यानंतरच तुम्ही हसण्यासाठी सक्षम होऊ शकाल. कधी कधी आपण फक्त विचार टाळण्यासाठी किंवा स्वतःकडे पाहण्यापासून टाळण्यासाठी हसता. परंतु, आपण त्या क्षणात पाहता आणि अनुभवता तेव्हा प्रत्येक क्षणात तुम्हाला जीवनाची प्रखर उपस्थिती जाणवते. मग आपल्याला कोणतीही गोष्ट त्रास देऊ शकत नाही किंवा आपल्याला स्पर्श करू शकत नाही. ते हास्य प्रामाणिक असते. तुम्ही कदाचित सहा महिने किंवा एक वर्षांचे बाळ पाहिले असेल, ते हसते तेव्हा त्याचे संपूर्ण शरीर हलते आणि उडी मारते. शरीरातील प्रत्येक पेशी हसत असतात. हे ज्ञान आहे. ते हास्य उपयोगी, निरागस, शुद्ध आणि निःसंकोच आहे. विविध मते म्हणजे आपल्या मनात निर्माण केलेले ठसे आहेत. एखाद्या अनुभवाची आपल्या आयुष्यात चार-पाच वेळा पुनरावृत्ती झाली असल्यास आपले उर्वरित आयुष्य आपण त्या अनुभवांद्वारे पाहतो. आपल्याला गोष्टी जशा आहेत तशा दिसल्या पाहिजेत. आपण ते पाहण्याची गरज आहे. आयुष्याचा अर्क आतून फुलत जातो, तसे खरे हास्य दैवी शक्तीप्रमाणे प्रकट होत जाते. हास्याने हृदय उमलत जाते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sri sri ravishankar article Laughing and lovingly