
जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com
भारताची सर्वात अनुभवी तिरंदाज दीपिकाकुमारी हिने चीनमधील विश्वकरंडक स्पर्धेत ब्राँझपदक पटकावत आपल्यामध्ये आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला पदक जिंकून देण्याची क्षमता आहे, हे दाखवून दिले. दीपिकाचे विश्वकरंडकातील हे ३७वे पदक होय. सध्या युवा खेळाडूंच्या तोडीसतोड खेळ करीत असलेल्या ३० वर्षीय दीपिकाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, विश्वकरंडक, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धा या सर्वच प्रतिष्ठांच्या स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली आहे; मात्र चार ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊनसुद्धा तिला देशासाठी पदक जिंकता आलेले नाही. हीच बोचणी तिच्या जिव्हारी लागत आहे. लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये पदक पटकावण्याचे मिशन पूर्ण करण्यासाठी दीपिका प्रयत्नांची शिकस्त करीत आहे. याच पार्श्वभूमीवर तिच्याशी संवाद साधला...