- केतन पुरी, ketan.author@gmail.com
विरूपाक्ष मंदिर ते लक्ष्मी- नृसिंह प्रतिमा या दरम्यान असलेल्या ऐतिहासिक वास्तूंविषयी मागील भागामध्ये आपण धावता आढावा घेतला. याच विरूपाक्ष मंदिराकडून एक रस्ता हंपी बाजार मार्गे तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरून पुढं जातो.
हा विजयनगर कालखंडातील राजमार्ग होता, असं अभ्यासक तसंच स्थानिक लोक सांगतात. याच राजमार्गाच्या दोन्ही बाजूस अनेक मंदिरे आहेत. त्यामध्ये राम मंदिर, अच्युतराय मंदिर, वराह मंदिर, राज तुला, विष्णू मंदिर, सुग्रीवाची गुहा, विजय विठ्ठल मंदिर यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचा समावेश होतो.