जगाला युद्ध नको बुद्ध हावा !

रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलिय या गणराज्यामध्ये जो संघर्ष पेटला त्या संघर्षाचे रूपांतरण युद्धामध्ये होऊ नये यासठी सिद्धार्थ गौतमाने वयाच्या २९ व्या वर्षी ग्रहत्याग करून मानवी जीवनाचे सत्य काय ?
Gautam Buddha
Gautam Buddha sakal
Summary

आज तथागत गौतम बुद्धाची २५८४ वी जयंती ! जगला, शांती, करुणा, मेत्ता (मैत्रीभाव) व समतेचा संदेश देणाऱ्या महाकारुणीक सम्यक संबुद्धास अजदिनी विनम्र अभिवादन. अत्तो दिप भव ! स्वंय प्रकाशित व्हा !

आज तथागत गौतम बुद्धाची (Gautama Buddha)२५८४ वी जयंती ! जगला, शांती, करुणा, मेत्ता (मैत्रीभाव) व समतेचा संदेश देणाऱ्या महाकारुणीक सम्यक संबुद्धास अजदिनी विनम्र अभिवादन. अत्तो दिप भव ! स्वंय प्रकाशित व्हा ! तथागताचे हे विचार आजच्या वाढत्या विषम सामाजिक-आर्थिक परिस्थितीमध्ये मानव केंद्रित विकासाच्या दृष्टीने अतिशय समर्पक आहेत. भारतात आणि जागतिक स्तरावर्ती सर्व-समावेशी आणि शाश्वत विकसासाचे ध्येय गाठण्यासाठी आज जगला युद्धाची नसून बुद्धाच्या विचारानुसार पुढे जाण्याची गरज आहे.

रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलिय या गणराज्यामध्ये जो संघर्ष पेटला त्या संघर्षाचे रूपांतरण युद्धामध्ये होऊ नये यासठी सिद्धार्थ गौतमाने वयाच्या २९ व्या वर्षी ग्रहत्याग करून मानवी जीवनाचे सत्य काय ? याचा शोध घेण्यसाठी भ्रमण सुरु केले. मानवाचा जन्म आहे तर मृत्यू देखील आठळ आहे. जन्म-मृत्यूच्या या चक्रामध्ये दुखः आहे. दुखां:ला कारण मानवाची तृष्णा तथा लोभ आहे.

दुख्खांचे निवारण करण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने स्वनुभव, कठोर साधना,ध्यान व चिंतनातून सम्यक प्रज्ञा विकसित केली. भारतात ब्रह्ममनवादी व्यवस्थेने स्वताचे वर्चस्व स्थापित करून स्वहित जपण्यासाठी जातीय उतरंडीतील विषमतावादी समाजव्यवस्थेची निर्मिती केली. या व्यवस्थेविरुद्ध तथागत गौतम बुद्धाने पहिला आवाज उठवला. भिक्खू संघाची स्थापना करून समतामुलक समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी धम्माचा प्रचार सुरु केला. कोणताही मनुष्य हा त्याचा जन्माने उच्च-नीच ठरत नाही. तर तो त्याच्या कर्माने श्रेष्ठ ठरतो. लोकांना वैदिक धर्मरूडी,कर्मकांडा व अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी धम्म देशनेच्या माध्यमातून प्रबोधन सुरु केले.

मानवाचा ठाई असणारा लोभ, तृष्णा हि मुलतः मानवी मनात निर्माण होते. त्यामुळे तथागताने धम्माची शिकवण देत असताना मानवी मनाला केंद्रस्थानी ठेवले. कोणतेही कुशल-अकुशल विचार हे प्रतमताः मानवी मनात निर्माण होत असतात. त्यामुळे चित्ताची एकाग्रता असणे अत्यावश्यक आहे. प्रज्ञा, शिल, करुणाया तत्वांचा अंगीकार करून धम्मानुसार आचरण केल्यास दुखा:चे निवारण होऊ शकते व याच जीवनामध्ये प्रत्येकजण सुखी समाधानी व शांतीपूर्ण जीवन जगू शकतो हा महत्वपूर्ण शोध तथागताने अडिच हाजार वर्षापूर्वी लावला. प्रेम, मेत्ताभाव, समता या मुल्यावारती वैश्विक शांती व सामातामुलक समाजव्यवस्था प्रस्थापित केली जाऊ शकते. व्यक्ति, समूह, समुदाय, राष्ट्र व वैश्विक कल्याणासाठी बुद्ध, धम्म आणि संघ या त्रीसरणास बांधील राहून आचरण केल्यास “भवतु सब्ब मंगलम” साधले जाऊ शकते. त्यासाठी व्यक्तीने मध्यम मार्गाचा अवलंब करून नेहमी कुशल कार्य करत राहाणे आवश्यक आहे.आज जे विचार-आचार

आपण पेरतो त्याचेच फळ येणाऱ्या काळात आपणस मिळत असते. अशी सरळ साधी शिकवण लोकांना दिली. हिंसा, चोरी, कामवासना, मादक द्रव्याचे सेवन यापासून लोकांना अलिप्त राहण्याचे आव्हान केले.

सुत्तपिठक, विनयपिठक, व अभिधम्म पिठक, पंचशील, आर्य आष्टांगीक मार्ग, महामंगल सुत्त यांचा प्रचार -प्रसार भिखू संघाच्या माध्यमातूनकेला. तथागत गौतम बुद्धाचे विचार सम्राट अशोकाने संपूर्ण भारतात व इतर आशियाई राष्ट्रामध्ये पोचवले. परंतू भारताचा इतिहास हा ब्राहामनवाद-विरुद्ध बुध्दवाद असाच राहिला आहे. एकेकाळी संपूर्ण भारतभर पसरलेला बुद्ध धम्माचा इतिहास याचं मातीत गाडला गेला. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, अशा खोटा अपप्रचार करून बुद्धाचे दैवीकरण करण्यात ब्रह्मामनवादी व्यवस्था यशस्वी ठरली. परंतू डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या विशाल प्रज्ञच्या बळावरती हिंदू धर्माचा चिकित्सकपणे अभ्यास करून गाडलेल्या बुद्धाचा इतिहास भारतात पुनर्जीवीत केला.

भारतातील जातीसंस्था: संरचना आणि विकास (१९१६) हा निबंध कोलंबिया विद्यापीठमध्ये सादर केला. अमानवीय विषमतावादी जाती संस्थेचे मूळ ब्रह्ममवादी व्यवस्थेत आहे याचा शोध लावला. त्यानंतर अस्पृश्य, शुद्र पूर्वी कोण होते? रिडल्स इन हिंदूईझम, जातीव्यवस्थेचे समूळ उच्चाटन (१९३६), बुद्ध आणि त्यांचा धम्म ! या ग्रंथाची निर्मिती केली. १९३५ साली डॉ. आंबेडकरांनी येवला नाशीक येथे ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’’ हि धर्मांतराची घोषणा केली. त्यानंतर डॉ. आंबेडकरानी २१ वर्ष वेगवेगळ्या धर्माचा चिकित्सकपणे अभ्यास केला.

तत्पूर्वी हिंदू धर्मांचा पुरस्कार करून चातुर्वण व्यवस्थेचे उदातीकरण करणाऱ्या नेत्यांना, सुधारकांना हिंदू धर्मामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेकवेळा आव्हान केले. हिंदू कोड बिल त्यतलेच एक महत्वपूर्ण पाऊल होते. नेहरू कॅबिनेटमध्ये हे बिल पारित न झाल्यामुळे शेवटी डॉ. आंबेडकरानी कायदे मंत्री पदाचा राजीनाम दिला पण प्रबुद्ध भारताचे स्वपन साकार करण्यासाठी विचाराशी तडजोड केली नाही. डॉ. आंबेडकरांनी शेवटी १९५६ साली नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायासह धर्मांतर करून सांस्कृतिक परिवर्तनाची सुरुवात केली.

भारतासह जागतिक स्तरावती केवळ पाच टक्के लोकाकडे पंच्य्नाव टक्के लोकांची संपत्ती, संसाधने एकवटली गेली आहेत. मुनाफाखोर बाजरी अर्थव्यवस्थेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन नैसर्गिक चक्र बदलत चालले आहे. दिवासंदिवस तापमानाचा उच्चांक वाढत चालला आहे.याला एकमेव कारण आहे ती नाफावादी भांडवलशाही आर्थव्यवस्था! या मुनाफावादी व्यवस्थेन ऐहिक भौतीक सुखासाठी जेविज्ञान तंत्रज्ञान मानवाने विकसित झाले आहे तेच आज मानवाच्या जीववरती बेतले आहे. यांची प्रचीती आपणास रशिया-युक्रेन मध्ये सुरु असलेल्या युद्धामधून पहिला मिळत आहे. रशिया व युक्रेन या दोन्ही राष्ट्रातील अनेक सैनिकाना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. युक्रेनमधील अनेक शहरे उद्ववस्त होऊन नेस्तानुबूत झालीआहेत. अनेकांना आपली घरे-दारे सोडून शेजारील राष्ट्रामध्ये पलायन करावे लागले. घरे, कारखाने उध्वस्त होऊन अर्थव्यवस्था ठप्प झाली. या युद्धामध्ये मानवानेच तयार केलेली हत्यारे, बंदुका, दारुगोळे, रणगाडे, अणुबॉम्ब मानवाचाच जीव घेत आहेत. या युद्धाने भौतीक नुकसान तर केलेच आहे परंतू ते पर्यावरणाचा ऱ्हास देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. निसर्गालाही यांची किमंत मोजावी लागत आहे. अनेक संसाधने, प्राणी यांचेही अतोनात नुकसान झाले. करोनाच्या आपतीनंतर आनेक राष्ट्रे स्वताला सावरत असताना या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील त्याचे विदारक परिणाम दिसून येत आहेत.

वर्ल्ड इनईक्वालीटी रिपोर्ट २०२२ नुसार भारतातील आर्थिक विषमतेची दरी दिवसांदिवस वाढत आहे. भारतातील १० टक्के लोकांच्या हातात देशाचे ५७% उत्त्पन्न एकवटले गेले आहे. १% लोक देशाची २२% संपत्ती नियंत्रित करत आहेत. महागाईने उच्चांक गठला आसून एप्रिल महिन्याच्या आकडेवारीनुसार महागाईचा दर (७.७९) वरती पोहचला आहे. डीझेल पेट्रोलच्या किमंती वाढल्यामुळे खाद्यपदार्थाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. घरगुती वापराचा गसची किंमत एक हाजार रुपयाच्या जवळपास पोहोचली आहे. याची सर्वाधिक झळ गरीब सामान्य जनतेला सोसावी लागत आहे. तुसठीकरणाच्या राजकारणाने चरणसीमा गाठली आहे. मंदिरातील घंट्या, भोंगे, यावरती राजकारण करून गरीब जनसामन्या लोकांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न गोदी मिडियाकडून दाबले जात आहेत. अल्पसंख्याक समुदायविषय द्वेष पसरवून, व्यक्तिगत धार्मिक श्रद्धा व आस्थेचे विषय सार्वजनिक जीवनामध्ये आणले जात आहेत. भारतातील हि सर्व विदारक परिस्थिती सांविधानिक मार्गानेच सोडवली जाऊ शकते. भारतीय संविधानाचा पाया मजबूत असल्यामुळे आजच्या या विषम परिस्थीतीमध्ये देखील लोक शांती आणि संयमानेच जगण्याचा प्रयत्न करत आहेत.

डॉ. आंबेडकराना अभिप्रेत असेलेलीलोकशाही समाजवादी व्यवस्था हा बुद्ध विचारावरती आधारलेला असल्याची प्रचीती वेळोवेळी येते. क्रांती आणि प्रतिक्रांती, बुद्ध की कार्ल मार्क्सया भाषणामध्ये बाबासाहेबांनी मार्क्सच्या रक्तरंजीत क्रांतीचे खंडन करून सांविधानिक मार्गाचाच पुरस्कार केला आहे. डॉ. आंबेडकरानी सांगितलेला बुद्ध हा आजच्या आधुनिक जगतासाठी नवयांना बुद्ध आहे. तो देवाचा अवतार नाही तो रोजच्या जीवनातला सामाजिक-आर्थिक समता प्रस्थापित करण्याचा आचार-विचार आहे. तो सर्वजण हिताय, सर्वजण सुखायचा मार्ग आहे. विश्वगुरु होण्याचे स्वप्न पहाणाऱ्या भारताला देखील प्रथमस्थानी तथागत गौतम बुद्धाला गुरु मानून आधुनिक व नव्याभारताची राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जडणघडण हि स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, शांती या पंचसूत्रीवरच करावी लागले. तथागताने सांगितलेल्या मेत्ता (मैत्री) सिद्धान्तानुसार विश्व बंधुता निर्माण करू शकू आणि स्वाभिमानाने म्हणू शकू जगला युद्ध नको बुद्ध हावा !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com