Suhas Bahulkar Painter Profile : चित्रकूटपासून संग्रहालय, लेखन आणि भित्तिचित्रांपर्यंत सुहास बहुळकर यांचा कलेला लोकांपर्यंत नेणारा प्रवास

Contemporary Indian Artists : ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांनी चित्रकला, लेखन आणि अध्यापन या क्षेत्रांत दिलेल्या योगदानासह, नानाजी देशमुखांच्या चित्रकूट प्रकल्पातून सामान्य माणसाला कलेची गोडी लावण्यासाठी केलेले काम त्यांच्या प्रगल्भ आणि संयमी व्यक्तित्वाचा परिचय करून देते.
Suhas Bahulkar Painter Profile

Suhas Bahulkar Painter Profile

esakal

Updated on

हर्ष भटकळ - saptrang@esakal.com

थोडक्यात पण नेमके सांगायचं हा शिरस्ता चित्रकार सुहास बहुळकर यांनी सतत जपला. कला, त्यासंबंधीचे लेखन आणि अध्यापन हे सगळे त्यांनी केलं. त्याचबरोबर तळागाळातल्या माणसालाही चित्रकलेची गोडी लागावी, त्याचाही त्यात सहभाग असावा असे काम नानाजी देशमुख यांच्या चित्रकूट प्रकल्पात त्यांनी केले. दृश्यकला, शिक्षण आणि इतर अनेक क्षेत्रात बहुळकर रमत गेले.

सुहास बहुळकर यांची मुलाखत चालू असताना त्यांना अचानक एक जुनी आठवण येते. विख्यात साहित्यिक आचार्य अत्रे सहज म्हणाले होते ते त्यांच्या स्मरणात रुतून बसले. ‘सविस्तर लिहिणे सोपे असते, पण तेच थोडक्यात स्पष्टपणे सांगणे कठीण असते.’ हा सल्ला फक्त लेखनाच्या बाबतीत लागू नाही तर एकूण विचारांनाच. त्यांच्याशी बोलताना लक्षात येते की हा संदर्भ भाषाव्यवहाराच्या पलीकडेही जातो. दृश्यकला, शिक्षण आणि इतर अनेक क्षेत्रात बहुळकर रमत गेले त्यांनाही हे लागू पडते. कोणत्याही बाबतीत अतिशयोक्ती न करता किंवा स्वतःकडे मोठेपणा न घेता ते साधेपणाने बोलतात आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या शब्दांना वजन प्राप्त होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com