सुसाइड

- डॉ. श्‍यामल सराडकर
Monday, 12 August 2019

सभोवतालचं अस्तित्व, माणसं जेव्हा आपल्याला वेदना, दु:ख देतात, असं वाटतं किंवा आपल्याला आलेले अनुभव जेव्हा दु:खद, वेदनादायी आहेत असं वाटायला लागतं, तेव्हा माणूस परिस्थितीसमोर हतबल होतो. निराशेच्या वादळाशी चार हात करण्याऐवजी तो पलायन स्वीकारतो. हरतो. ही हेल्पलेसनेसची स्थिती माणसापरत्वे भिन्न असते. प्रत्येक माणूस जन्माला येतो तेव्हा एक जन्मजात डिझाइंड मेंदू घेऊन आलेला असतो आईबाबांच्या मार्फत. ही पृथ्वी, हे जग आपल्यासाठी अनोळखी असतं. मग हळूहळू ओळख व्हायला लागते.

सभोवतालचं अस्तित्व, माणसं जेव्हा आपल्याला वेदना, दु:ख देतात, असं वाटतं किंवा आपल्याला आलेले अनुभव जेव्हा दु:खद, वेदनादायी आहेत असं वाटायला लागतं, तेव्हा माणूस परिस्थितीसमोर हतबल होतो. निराशेच्या वादळाशी चार हात करण्याऐवजी तो पलायन स्वीकारतो. हरतो. ही हेल्पलेसनेसची स्थिती माणसापरत्वे भिन्न असते. प्रत्येक माणूस जन्माला येतो तेव्हा एक जन्मजात डिझाइंड मेंदू घेऊन आलेला असतो आईबाबांच्या मार्फत. ही पृथ्वी, हे जग आपल्यासाठी अनोळखी असतं. मग हळूहळू ओळख व्हायला लागते.
आपला स्वत:चा जेनेटिकली मिळालेला स्वभाव अन्‌ समाजाचा भाग म्हणून अवतीभवतीच्या माणसांचे, निसर्गाचे, आईवडिलांचे संस्कार, त्यांच्या जगण्याच्या कंसेप्ट्‌स, स्वभाव, हळवेपणा, खंबीरपणा, संकटांना सामोरं जाण्याची ताकद किंवा पलायन करण्याची पद्धत हे शरीर-मनाची वाढ होता होता आपण अगदी चेतन-अचेतनरीत्या बघत असतो. साक्षीदार असतो आपण. "जग सुंदर आहे किंवा वाईट आहे' या वाक्‍याच्या अवतीभवती आपल्या मनाची जडणघडण होत असते. मेंदूतही मग तसतसे सकारात्मक किंवा नकारात्मक बदल आपल्याही नकळत होतच असतात. ती एक अविरत चालणारी प्रोसेस असते. मेंदूतले न्यूरॉन्स मग केमिकल खेळ करत राहतात. आपण जसजसे मोठे होतो, टिकून राहण्याची स्पर्धा सुरू होते. डार्विन म्हणतो ते अगदी खरंच आहे. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. जो या वातावरणाशी ऍडजस्टमेंट करून माइंडफूल पद्धतीने सुखदु:खाला सामोरं जातो, तो या जगण्याच्या आपाधापीत टिकून राहतो. तो उन्मळून पडत नाही. बरेचदा कधी मग ही अशी ताकद कमी पडते.
क्षणात संपून टाकावं स्वत:ला, ही टोकाची भूमिका माणूस घेतो. क्षणात येणारा तो नकारात्मक विचार असतो. जीवनाला चहुबाजूंनी वेदनेनं घेरून टाकलंय अन्‌ आपण चक्रव्यूहात अडकलोय, असं वाटतं. खरंतर तो भ्रमच असतो. पण, त्या माणसासाठी त्या क्षणी अगदी खरा असतो. आजाराचाच तो भाग. त्याला सायकियाट्रिस्ट डॉक्‍टरांची, इव्हन क्‍लिनिकल सायकॉलाजिस्ट, कौंसेलर, सोशल वर्कर किंवा मित्रपरिवाराची मदत घेतली, तरीही ती मनाची घालमेल थांबवता येऊ शकते. पण, मेंटल इलनेस किंवा मनासंदर्भात आपल्याकडे अजूनही स्पष्टपणा नाहीये. चार लोक काय म्हणतील, यावरच आपण अडून आहोत. बिनधास्त मदत मागणारी जीवनशैली असली की असे इंपलसिव्ह क्षण आटोक्‍यात आणता येतात. आता सुसाइड हेल्पलाइन सेंटर 24 बाय 7 कार्यरत असते. सायकियाट्रिस्टपर्यंत पोचता येऊ शकतं. एकेक जीव महत्त्वाचा आहे. आपलं आयुष्य फक्त आपलं नसून, आपण या निसर्गाचासुद्धा भाग आहोत.

बऱ्याच थेअरीज आहेत याबद्दल...
लोक आत्महत्या का करतात, याबद्दल थॉमस जॉईनरची इंटरपर्सनल थेअरी खूप महत्त्वाची आहे.
समाजाशी तनामनानं जुळलेली सोशिअली कनेक्‍टेड माणसं आत्महत्येच्या टोकाला जात नाहीत. याउलट, एकाकी माणसांना आपण जगून काही फायदा नाही, असं वाटतं. मृत्यूची इच्छा जगण्याच्या इच्छेवर भारी पडते. डेथ विशचे पारडे लाइफ विशवर भारी पडते.
ताण, आर्थिक बोझा, असाध्य, पेनफूल शारीरिक आजारांमुळंही
जीवन नकोसं वाटतं.
इमिल डरखम या फ्रेंच फिजिशियननुसार, तीन प्रकार असतात आत्महत्येसंबंधित.
1) इगोइस्टिक सुसाइड : जेव्हा कल्चर अन्‌ समाजात माणूस एकटा पडतो. सोशल सपोर्ट अन्‌ कंफर्ट मिळत नाही.
2) अनोमिक सुसाइड : सोशल इनस्टेबिलिटी. समाजाशी पटत नाही.
3) अल्ट्रअस्टिक सुसाइड : देशासाठी, समाजासाठी मरण पत्करणे. लढाईत जीव देणे.
फ्राइडनुसार, मनात दुसऱ्याबद्दल निर्माण झालेली तीव्र रागाची भावना कारणीभूत ठरते. डेथ विश.
मेनिंगर म्हणतो की, विश टू किल, विश टू बी किल्ड आणि विश टू डाय या तीन घटना तीव्र स्वरूपात क्षणात घडतात. पण, नवीन रिसर्च अन्‌ आताच्या न्यूरोसायकियाट्रीच्या शास्त्रानुसार, बायलॉजिकल लेटेस्ट मेडिकल कारणं हीच सर्वांत महत्त्वाची. मेजर डिप्रेशन, निराशा.
त्यानुसार सेरोटोनिन कमी होणं हे मुख्य कारण. ते बाहेरून औषधं देऊन वाढवता येणं ही ट्रीटमेंट. इतकं सोपं. जेनेटिक कारणंसुद्धा असतात.
सुसाइड ही आता जागतिक इमर्जन्सी म्हणून फोफावतेय. भौतिक सुखाच्या शोधात माणूस हरवून जातोय. मनाची बेचैनी, मनाचं निरोगी असणं त्याला महत्त्वाचं वाटत नाही. पैसा, प्रसिद्धीच्या नादात छोटे-छोटे क्षण जगणं तो दुय्यम ठरवतो. प्रायोरिटीज त्याला लक्षात येत नाहीत. थांबणं तो विसरलाय. परस्परांवर माया लावणे, प्रेम करणे हे फालतू वाटायला लागलंय. मशीन होत आहोत आपण या स्मार्टी टेक्‍नॉलॉजीपुढं. दर वर्षी लाखो लोक या आजाराच्या विळख्यात येतायत. प्रोग्रेस वाढतोय; पण आकडा कमी व्हायचं नाव घेत नाही.
तरुणाईत, 15 ते 40 या वयोगटात ही भावना फोफावतेय. 95 टक्के केसेसमध्ये मानसिक आजार किंवा मेंटली डिस्टर्ब असणं हे सर्वांत महत्त्वाचं कारण. इथेच खरी गडबड आहे. सायकियाट्रिस्ट किंवा इतर मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सपर्यंत पोचता आलं की, हा प्रकार थांबवता येऊ शकतो. समाज मात्र अजूनही याबद्दल सज्ञान नाही. खूप अवेयरनेस वाढवण्याची गरज आहे. निराशा, डिप्रेशन, क्रॉनिक, शारीरिक आजार, इंपलसिव्ह, टोकाचा राग, नशा, सडन मूड शिफ्ट ही महत्त्वाची कारणं.
सायन्स म्हणतं की, जवळपास सारेच सुसाइडल बिहेव्हियर थांबवता येऊ शकतं. बदल घडवून आणल्या जाऊ शकतो. रिस्क फॅक्‍टर ओळखता येणं अन्‌ वेळ न दवडता डॉक्‍टरपर्यंत पोचता आलं की, हळूहळू बरी होणारी ही प्रक्रिया आहे.
कुणावरही कधीही पाळी येऊ शकते. स्वत:ला संपवण्याइतपत टोकाला जातो माणूस. ती एक साचत गेलेली अन्‌ क्षणार्धात अचानक
डोकं वर काढणारी नैराश्‍याची अवस्था आहे. त्याला मदत हवीच. मानसोपचार डॉक्‍टरांची, समुपदेशनाची, कौंसेलिंगची, मित्राची, आपल्या जिवाभावाच्या माणसांची, प्रेमाची... मदत घ्यायला लाज कसली? आपल्याला त्रास होतोय
हे कळणं अन्‌ न लपवता कुणाला सांगता येणं तसं डेरिंगबाज असण्याची पावती. दु:ख वाईट नाहीच. ती एक अवस्था आहे. मरेपर्यंत अधूनमधून येणारच. सोप्पं आहे. मनाप्रमाणं होत नाहीच बरेचदा. सारं ऐशोआराम, सुखसोयी असूनही माणूस विवंचनेत असू शकतो. मनाला, मेंदूतल्या रसायनांना वैभव, नाव, अध्यात्म, बडेजाव काही काही कळत नाही. त्याला फार नकारात्मक तीव्रतेचं, अपेक्षांचं ओझं नकोसं असतं. त्याला नैसर्गिक सहजता अन्‌ निरोगीपण हवं असतं. ते तो शोधतो आयुष्यभर अन्‌ कित्येकदा बेभान होऊन त्या सुखाच्या मृगजळी शोधात हरवून जातो. सुखाची, समाधानाची कारणं शेवटी आपल्याच मेंदूत, मनात असतात. हे समजलं की माणूस खऱ्या अर्थानं समग्र शहाणा, समजदार होतो.
आपल्या मेंदूतल्या केमिकल रसायनांचा लोचा ओळखणं आपल्याही पेक्षा
आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या जिवाभावाच्या माणसांनी ओळखणं आवश्‍यक. अँटीडिप्रेसंट औषधांसोबतच जीवनदृष्टिकोन बदलण्याची प्रोसेस सायकोथेरपीद्वारे केली जाते.
हे जीवन अनोखं आहे. "कसले विचार येत होते तेव्हा आपल्या मनात' या विचाराने मग आपलंच आपल्याला हसू येतं. काट्यांची मखमल होते. प्रवास सुंदर होतो.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suicide