‘धूम-३’ चित्रपटाचा नायक आमिर खान हा सुसाटपणे सुपरबाइक पळवतो तेव्हा चित्रपटगृहात तरुणाईचा एकच कल्लोळ उडतो. अरे यार, अशी भन्नाट बाइक आपल्याकडे असती, असे अनेकांना वाटू लागते. अर्थात ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खिसा बराच रिकामा करावा लागतो. पण सामान्य असो किंवा श्रीमंत असो या वर्गातील तरुणाईला सुपरबाइकने नेहमीच भुरळ पाडली आहेेे.