गाझा युद्धामुळे लेबनॉन आणि सीरिया देशांसह मध्य पूर्वेतील भूमसामरिक समीकरणे बदलून गेली आहेत. इस्राईलच्या हल्ल्यात हिज्बुल्ला व इराण कमकुवत झाल्याचा परिणाम सीरियावर झाला आहे. गाझा आणि युक्रेन युद्धामुळे १३ वर्षांपासून गृहयुद्धाला तोंड देणाऱ्या सीरियातील बशीर अल असाद सरकारचा पाडाव होण्याची शक्यता आहे. सीरियामधील गृहयुद्ध निर्णायक वळणावर आहे.