सुन्नीबहुल सीरियावर अल्पसंख्याक शिया पंथीय असाद कुटुंबाने ५० हून अधिक वर्षे राज्य केले. त्यांची राजवट अत्यंत क्रूर होती. सत्तेला आव्हान देणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी ठेचून काढले. असाद यांच्याविरोधात डोके वर काढणारे हम्मा शहर जमीनदोस्त करण्यात आले. त्या नरसंहारात तेव्हा ३० ते ४० हजार नागरिकांना ठार मारण्यात आले होते. रिफात असाद यांना हम्मा शहर नेस्तनाबूत केल्याचा आणि आपलेच देशवासीय असलेल्या हजारो नागरिकांना यमसदनी पाठवल्याचा अभिमान होता...