Premium|Tambde Baba : ...असे बाबा लांबच ठेवायचे असतात

The Fear Behind Tambde Baba : ‘तांबडेबाबा’च्या काल्पनिक व्यक्तिरेखेतून भीती, अंधश्रद्धा, लाच आणि अपराध लपवण्याची मानसिकता उलगडते; श्रद्धेच्या नावाखाली माणूस स्वतःच्या भीतीला आधार देत कसा जगतो, यावर भाष्य केले आहे.
The Fear Behind Tambde Baba

The Fear Behind Tambde Baba

esakal

Updated on: 

डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com

तीन - चार वर्षे चाललेला हा प्रवास अंतिमतेकडे आलाच... येतोच तो... दादा होळकरला... तांबडेबाबाला सोडायची, निरोप द्यायची वेळ येऊन ठेपली होती. आरशात दादा होळकरला पाहिलं... त्याच्या मागच्या तसबिरीत तांबडेबाबाला पाहिलं... दादा होळकरचा अंगरखा तांबडेबाबावर टाकला... तांबडेबाबा दिसेनासे झाले... ते तसेच व्हावेत...

खरंच असं कुणी तांबडेबाबा वगैरे आहे का...? असा प्रश्न मला किंवा मालिकेत काम करणाऱ्या इतरांना प्रेक्षक चिकित्सेनं विचारत.

मागे म्हटल्याप्रमाणे एक दादा होळकर नावाचा अतिशय घाणेरडा, खुनशी माणूस तो स्वतःचा किंवा त्याच्या परिवाराला जपण्यासाठी एक असं श्रद्धास्थान तयार करतो. एखाद्या गुरुला, बाबाला पुजतो आणि त्याची भीती नाहीशी होते.

अलीकडेही अनेक दानधर्म (सरसकट नव्हे) असेच भीतीपोटी, लाचेपोटी दिले जातात. तत्कालीन आपण आपल्या गुरुला समाधानी केलं. आपण आपल्या बाबाला खूश केलं. आता मी काहीही केलं तरी मला त्याच्यातून वाचवायची जबाबदारी आता बाबांची आहे... ते बघतील... बघतात... मोठमोठ्या देवस्थानात आपण पाहतो. काही भक्त अगदी सढळ हस्ते दान करत असतात. काल्पनिक तांबडेबाबा तयार करून त्याच्या मागे लपणारा दादा होळकर काय आहे... अतिशय भित्रा माणूस... पण दरडावून बोलायचं, समोरच्याला धाकात घ्यायचं... पैशानं गप्प करायचं, पैसे देऊन शांत करायचं... यातून निर्माण होणारी भीती, आरत्या गाऊन, तांबडेबाबाला खूश लाचखोर बनवायचं... आणि त्या स्वतःच्या मनात तयार केलेल्या जगतात रमायचं...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com