Goa Temples Heritage : तांबडी सुरला महादेव मंदिर; गोव्याच्या प्राचीन स्थापत्याचा अनमोल ठेवा

Goa Temples Heritage : गोव्यातील मोलेम अभयारण्यात वसलेले तांबडी सुरला येथील १२ व्या शतकातील प्राचीन महादेव मंदिर हे कदंब स्थापत्यशैलीचा अद्वितीय आणि नयनरम्य नमुना आहे.
Goa Temples Heritage

Goa Temples Heritage

esakal

Updated on

ओंकार वर्तले

गोव्यातील साऱ्या मंदिरातही सगळ्यात देखण्या आणि वास्तू-स्थापत्यात सजलेल्या मंदिराचा मान मिळवला आहे तो तांबडी सुरला महादेव मंदिराने. मंदिर अभ्यासकांच्या मते हे मंदिर गोव्यामधील सर्वात प्राचीन आहे. मोलेम नावाच्या अभयारण्यात वसलेले, निसर्गाच्या शब्दशः कुशीत वसलेल्या या मंदिराच्या परिसरातील शांतता अक्षरशः अनुभवावी अशीच आहे आणि विशेष म्हणजे गोव्याच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे या मंदिराची निगराणी अगदी व्यवस्थितपणे ठेवली गेली आहे. येथे येण्यासाठी मात्र वाहन असणे गरजेचे आहे. अभयारण्यात असल्यामुळे सायंकाळी पाचनंतर मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नाही. गोव्यावर कदंब राज्यसत्तेने साधारण १०व्या ते १३व्या शतकात राज्य केले. त्यानंतर परकीय आक्रमणे झाली; परंतु या कदंब घराण्याने ही वैभवशाली कलाकृती उभारून या गोव्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे गोव्याच्या भागात तुम्ही आलात की कदंबानी बांधलेले हे अद्वितीय देवालय मस्ट वॉच या जातकुळीतले आहे.

अभ्यासकांच्या मते या मंदिराचे स्थापत्य यादव काळात बांधलेले हेमाडपंथी मंदिराशी सुसंगत आहे. तर या मंदिरावर दक्षिणेकडील राजसत्ता असलेल्या चालुक्य-होयसळ स्थापत्याची छाप असल्याचेही काही जणांचे मत आहे. काही अभ्यासक हे जैन मंदिर असावे, असेही सांगतात. ही सारी मतमतांतरे सोडली तर एक सत्य मात्र निर्विवाद आहे, ते म्हणजे शांत वातावरणात, पर्वतराजीच्या कुशीत उभारलेले आणि दाट झाडीत हे मंदिर यादव-कदंब शैलीतील गोव्यातील सर्वात प्राचीन मंदिर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com