

Bangladesh Political Crisis and Stability
sakal
महेंद्र वेद - saptrang@esakal.com
देशाला अस्थिरतेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी निवडणूक हा नागरिकांच्या समोरील सर्वोत्तम पर्याय असतो. श्रीलंका आणि नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या निदर्शनांनंतर बांगलादेशातील स्थिरताही नष्ट झाली होती. मात्र, आता तिथे काही प्रमाणात स्थैर्य पुनर्स्थापित झाले आहे. तब्बल वीस महिन्यांच्या अस्थिरतेनंतर निवडणुकांनी स्पष्ट कौल दिला असल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.