

Poetry Beyond Words
esakal
मंगलमय वातावरणात उजळण्यामागचं जळणं जाणवत राहावं हे कवीचं पर्यायाने कवितेचं भागधेय असावं...’ या भूमिकेतून आणि अव्यक्ताला व्यक्तात मांडण्याच्या ध्यासातून जन्माला आलेल्या कवितांचा संग्रह म्हणजेच कवी, लेखक, गीतकार दासू वैद्यलिखित ‘तथापि’!
‘कवी जेव्हा लिहीत नसतो तेव्हाच लिहीत असतो आणि प्रत्यक्षात लिहीत असतो, तेव्हा फक्त कागदावर उतरवत असतो. द्रवरूप मानसिकतेतून मन कायम गर्भार असतं. त्यामुळे ज्या दिवसाच्या झोळीत कवितेचं दान पडलं, तो दिवस विशेषच! पण या सफल दिवसांसाठी इतर दिवसांनी गर्भवास सोसलेला असतो. रंग, गंध, स्पर्श, ध्वनीच्या रूपात काय काय साठवलेलं असतं याची कल्पनासुद्धा करणं अवघड आहे....!’ ‘तथापि’च्या शेवटी असलेल्या ‘उजळण्यामागचं जळणं’ ह्या मनोगतातल्या या ओळी वाचक म्हणून कवीची मनोवस्था समजून घेण्यास, त्या दृष्टीने काव्यवाचन करण्यास मदत करतात.