मदत हवीय शाळा व मुलींसाठी!

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अ‍ॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.
Saraswati Primary School Toilet
Saraswati Primary School ToiletSakal
Summary

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अ‍ॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अ‍ॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अ‍ॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली.

शाळांसाठी ‘अ‍ॅक्ट फॉर एज्युकेशन’

शाळांमध्ये अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे किंवा चांगल्या स्वच्छतागृहांच्या अभावामुळे प्रामुख्याने मुलींची मोठी गैरसोय होते. शाळांमध्ये चांगली स्वच्छतागृहं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून, विद्यार्थ्यांनी डिजिटल साक्षर होणं आवश्यक आहे हे ओळखून, ‘सोशल फॉर अ‍ॅक्शन’ या अभियानांतर्गत स्वच्छतागृह उभारणी, डिजिटल ई-लर्निंग सुविधा अशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभागाच्या व सामूहिक मदतीच्या (क्राउड फंडिंगच्या) माध्यमातून ‘अ‍ॅक्ट फॉर एज्युकेशन’ उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत भोर व तालुक्यातील तांभाड येथील जि. प. प्राथमिक शाळेत व वेल्हे तालुक्यातील सरस्वती माध्यमिक विद्यालय येथे स्वच्छतागृहांचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं असून, पुरंदर व दौंड तालुक्यातील अनुक्रमे दोन शाळांमध्ये स्वच्छतागृहांचं काम सुरू आहे. तसंच, पुणे जिल्ह्यातील खेड व आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन प्राथमिक शाळांना ई-लर्निंग सेटअप उपलब्ध करून दिला आहे.

मुलींना मिळणार सायकली...

औरंगाबादहून जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाताना अवघ्या वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर फुलंब्री तालुक्यात राजूर गणपतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वसलेलं पिंपळगाव गांगदेव हे एक टुमदार गाव आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून, शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. १९५९ मध्ये शाळेची स्थापना झाली असून, चालू शैक्षणिक वर्षात शाळेत एकूण ९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तसंच चार शिक्षक कार्यरत आहेत. पिंपळगावच्या अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा असूनही गावातील शाळेची विद्यार्थिसंख्या वाढतच आहे. पिंपळगाव गांगदेव इथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. पुढील माध्यमिकचं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इथं पायी जावं लागतं. परंतु अनेक पालक आपल्या मुलींना पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर शाळा असल्याने पाठवत नाहीत. त्याचबरोबर जाण्या-येण्यासाठी मोठा प्रवास खर्च लागत असल्याने मुलींना शाळेत सुमारे पाच ते सहा किमी पायपीट करावी लागते. परिणामी अनेक मुलींचं शिक्षणही पालकांनी बंद केलं आहे. शाळेत मुलींना जाण्या-येण्यासाठी गावात सायकल बँक प्रकल्प राबविणं गरजेचं असून, सायकल बँक प्रकल्पासाठी समाजभान सदरात ‘सोशल फॉर अॅक्शन’ या अभियानाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं होतं.

या अभियानास पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप्स ऑफ इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेने प्रतिसाद देऊन, सायकल बँक प्रकल्पास मदत केली आहे. लवकरच तेथील मुलींना सायकली वाटप करण्यात येणार आहेत. तसंच, सायकल बँक प्रकल्प व स्वच्छतागृह प्रकल्प जास्तीत- जास्त दुर्गम व ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोहोचविण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतून मदतीची गरज आहे. सायकल बँक व स्वच्छतागृह प्रकल्पांसाठी समाजातील दानशूर व्यक्ती, विविध संस्था, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, औद्योगिक कंपन्या सीएसआर निधीतून आर्थिक मदत करू शकतात.

नियतीने दिला धक्का...

तनिष्का कोंडे या रक्ताच्या कर्करोगाने आजारी असलेल्या दहावर्षीय मुलीच्या उपचारांच्या मदतीसाठी ‘सोशल फॉर अ‍ॅक्शन’ अभियानाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं होतं. आवाहनास समाजातील दानशूर व्यक्तींनी चांगला प्रतिसाद देत मदत केली; पण शेवटी तनिष्काच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि तनिष्काला देवाज्ञा झाली. तनिष्कासाठी मिळालेली मदत तिच्या कुटुंबीयांना हॉस्पिटलच्या खर्चासाठी वर्ग करण्यात आली.

कशी कराल मदत...

https://socialforaction.com/ ही लिंक ओपन करून, ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी - भारतीय नागरिक ‘अॅक्ट फॉर एज्युकेशन’ व इतर अभियानाची माहिती घेऊ शकतात. तसंच ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट ‘सोशल फॉर अॅक्शन’ या वेबसाइटद्वारे ‘अॅक्ट फॉर एज्युकेशन’ या उपक्रमासाठी ऑनलाइन देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com