‘जिव्हाळा’ला हवी सक्रिय साथ

सकाळ सोशल फाउंडेशनच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.
Jivhala Foundation
Jivhala FoundationSakal
Summary

सकाळ सोशल फाउंडेशनच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.

सकाळ सोशल फाउंडेशनच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते.

‘जिव्हाळा’ म्हणजे प्रेम, माया - पुलकी.... जिव्हाळा फक्त नात्यातच आपल्या जिवलगांसाठी असतो असं नाही. आपल्या-परक्याचा भेदभाव न करता सर्वांसाठी, तसंच समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी प्रेम, माया व आपुलकी हृदयापासून येते, तो जिव्हाळा असतो.

समाजात बहुसंख्य स्त्रिया आपल्या कुटुंबावर अवलंबून असतात. तसंच, बऱ्याच स्त्रिया परावलंबी असल्याने प्रत्येक स्तरावर अन्याय सहन करत असतात. याशिवाय समाजातील दुर्लक्षित घटकातील, कमी उत्पन्न गटातील, निराधार व एकल पालक असणारी मुलं शिक्षणापासून कायम वंचित राहतात. महिलांना स्वतःच्या पायावर स्वावलंबी करण्यासाठी व वंचित घटकांतील मुलांना शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अ‍ॅड. शर्वरी मुठे, विनया चौधरी, सुजाता जोशी, शिल्पा चावडेकर, सोनाली अफझुलपूरकर या समवयस्क व समविचारी महिलांनी एकत्र येऊन २०१५ मध्ये ‘जिव्हाळा फाउंडेशन’ची स्थापना केली.

महिलांना प्रशिक्षणाद्वारे रोजगार- स्वयंरोजगार उपलब्ध करून देणं, शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण देणं, निराधार - गरजू व एकल पालक असणाऱ्या मुलींकरिता संपूर्णपणे मोफत वसतिगृह चालवणं व त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं, ही ‘जिव्हाळा फाउंडेशन’ची उद्दिष्टं आहेत. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत १५० गरजू महिलांनी शिवणकाम प्रशिक्षण घेतलं असून, शिलाई व्यवसायाच्या माध्यमातून त्या आर्थिक स्वावलंबी होऊन रोजगार मिळवीत आहेत. तसंच, शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण देण्यासाठी संस्थेकडून २०१७ मध्ये ‘अनुराधा पूर्व प्राथमिक’ शाळा सुरू करण्यात आली. शाळेतून आतापर्यंत अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. सध्या शाळेत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेले व आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना शिक्षण घेणं शक्य नव्हतं असे १२० निराधार, वंचित घटकातील व एकल पालक असणारे विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी, विशेषतः मुली या निवासाची सोय नसल्याने शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडल्याचं निदर्शनास आल्याने संस्थेमार्फत २०२१ मध्ये मुलींसाठी कै. सुरेश मुठे निवासी वसतिगृह सुरू करण्यात आलं आहे. आज पुणे शहर, सांगली, नाशिक, देहूरोड, आळंदी, इंदापूर येथील वंचित व कमी उत्पन्न गटातील काही मुली वसतिगृहात निवासी शिक्षण घेत आहेत. या मुलींच्या कुटुबीयांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने, त्यांना पुण्यात राहून शिक्षण घेता येत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडलेला होता. या सर्व मुलींचे पालक हे भटक्या - विमुक्त समाजातील व पाठीवर बिऱ्हाड असलेले आहेत. ‘जिव्हाळा फाउंडेशन’ संस्थेने या मुलींना केलेली मोफत निवास व्यवस्था, आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा व उत्तम शाळेत शिक्षण, यामुळे या मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकल्या आहेत.

वैशाली (नाव बदललं आहे) मुलीला शाळेत सोडायला येत असे, तेव्हा ती तेथे थांबत असे, तिला शाळेत काम करण्याविषयी विचारलं असता ती तयार झाली. काम करता करता तिला पुढील शिक्षण घेण्याबद्दल संस्थेतर्फे मदत व प्रोत्साहन देण्यात आलं. संस्थेच्या मदतीमुळे वैशाली स्वतः आर्थिक स्वावलंबी झाली व तिने पुढे १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असून, आता ती डीटीएड या अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत आहे. तसंच, संस्थेतर्फे मुलींसाठी चालविण्यात येत असलेल्या वसतिगृहात अनिता (नाव बदललं आहे) व तिची आई वसतिगृहात प्रवेश घेण्याकरिता आल्या होत्या, तेव्हा अनिता थोडी घाबरलेली होती. शाळा, अभ्यास यांच्याशी तिचा काही संबंध नव्हता, त्यामुळे सुरुवातीला तिला सगळं खूप अवघड वाटत होतं, कंटाळवाणं वाटत होतं; परंतु हळूहळू शिक्षकांच्या मदतीने तिने आभ्यासाला सुरुवात केली आणि सुरुवातीला बाराखडीही न ओळखता येणाऱ्या अनिताची आज पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी शाळेने निवड केली आहे. ही संस्थेसाठी खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.

वसतिगृहातील मुलींच्या दैनंदिन खर्चासाठी (कपडे, जेवण) वसतिगृहात लोखंडी कपाटं, बंक बेड, फर्निचर, खुर्च्या इत्यादींची अत्यावश्यकता आहे. तसंच, संस्थेअंतर्गत वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वांगीण विकासासाठी चालविण्यात येणाऱ्या ‘अनुराधा पूर्व प्राथमिक’ शाळेसाठी शैक्षणिक साहित्य (ई-लर्निंग सेट अप, पुस्तकं, स्टेशनरी, गणवेश, स्कूल बॅग आदी) व भौतिक साहित्यासाठी (बेंच, खेळ साहित्य) आदींसाठी संस्थेला सामूहिक मदतीची गरज आहे.

कशी कराल मदत...

‘जिव्हाळा फाउंडेशन’ या संस्थेला कोणत्याही प्रकारचं शासकीय अनुदान मिळत नाही. ही संस्था पूर्णपणे समाजातील दानशूर व्यक्तींच्या पाठबळावर उभी आहे. संस्थेला आपलं कार्य वाढविण्यासाठी सामूहिक मदतीची व निधीची गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘जिव्हाळा फाउंडेशन’ या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, ‘जिव्हाळा फाउंडेशन’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन, डोनेट नाऊ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० -जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

गणेशवरची शस्त्रक्रिया यशस्वी...

‘समाजभान’ सदरात दोन आठवड्यापूर्वी गणेश झांबरे या बत्तीसवर्षीय तरुणाच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनास समाजातील दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गणेशवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून, पुढील शस्त्रक्रिया एक ते दोन महिन्यांनी होणार आहे.

तत्पर मदतीचा हात देणारे....

‘सोशल फॉर अॅक्शन’ या अभियानाच्या माध्यमातून विविध स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांना दोन हजारहून अधिक रक्कम देणगी दिलेले देणगीदार : (काही देणगीदारांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवरही विविध संस्थांच्या सामाजिक उपक्रमांसाठी देणगी दिली आहे.) हेमंत कुलकर्णी, अत्रेय दंडे, प्रदीप बगाडे, भाग्यश्री संघवीकर, रोटोमॅटिक कॉर्पोरेशन, सुजाता सावंत, विजया पाटील, अनंत आवटे, अतुल यादव, तुषार टाकळुरे, सरिता भट, साई सरफेस कोटिंग वर्क्स, अरविंद लक्ष्मण मोहरे, मयूर जाधव, रामेश्वर ठोंबरे, सचिन वेहळे, संदीप काकडे, सेजल मार्केटिंग सर्व्हिसेस, प्रीती गुप्ता, प्रदीप बगाडे, सुधीर भिडे, मोहन कुलकर्णी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com